Farmer Agricultural News crop loan allocation rate fix Akola Maharashtra | Agrowon

अकोल्यात खरीप, रब्बीतील पिकांसाठी पीककर्ज वाटप दर निश्‍चित

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 मे 2020

अकोला  ः आगामी खरीप हंगामासाठी बँकांसाठी पीक कर्जदर जाहीर करण्यात आले आहेत. जिल्ह्यात बीटी कापूस लागवडीसाठी एकरी २१ हजार २०० तर हळदीसाठी सर्वाधिक ४२ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अकोला  ः आगामी खरीप हंगामासाठी बँकांसाठी पीक कर्जदर जाहीर करण्यात आले आहेत. जिल्ह्यात बीटी कापूस लागवडीसाठी एकरी २१ हजार २०० तर हळदीसाठी सर्वाधिक ४२ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नवीन हंगामासाठी पीककर्ज वाटप सुरु झाले आहे. प्रशासनाने या हंगामासाठी बँकांना पीककर्ज वाटपासाठी सूचना केल्या आहेत. त्यात २०२०-२०२१ या हंगामासाठी हेक्टरी पीककर्ज वाटपाचा दर निश्‍चित करून देण्यात आला आहे. प्रामुख्याने जिल्ह्यात सोयाबीन, कापूस या दोन पिकांचे सर्वाधिक क्षेत्र असते. यानुसार बागायती बीटी कपाशी लागवडीसाठी हेक्टरी ५३ हजार रुपये म्हणजेच एकरी २१ हजार२०० रुपये दर राहील. सोयाबीन पिकाला हेक्टरी ४५ हजार मिळणार असून एकरी हा दर १८०० रुपये एवढा राहणार आहे. खरीप ज्वारीला हेक्टरी २६ हजार, तुरीला ३६ हजार ७००, भुईमुगाला ३८ हजार, सूर्यफुलासाठी २६ हजार २०० रुपये दर निश्‍चित करण्यात आला. कोरडवाहू बीटी कपाशीला हेक्टरी ४३ हजार, संकरित ज्वारीला २५ हजार, तूर पिकाला ३१,५००, सोयाबीनला ४५ हजार, बाजरीला २० हजार, मूग-उडदासाठी १९ हजार, तिळासाठी २३ हजार १००, ओवा पिकासाठी १७ हजार रुपये हेक्टरी पीककर्ज मिळेल.

बागायती पिकांमध्ये केळीला ९३ हजार ५००, मिरचीला ७५ हजार ३००, हळदीला एक लाख ५ हजार, आलेसाठी ९७ हजार, पपईकरिता ७० हजार, डाळिंबासाठी १ लाख २१ हजार, बटाट्यासाठी ७३ हजार रुपये कर्ज मिळू शकेल.

रब्बीतील पिकांसाठी असे आहेत दर
खरिपासोबतच २०२०-२१ या वर्षात रब्बीतील पिकांसाठी पीककर्ज वाटपाचा दर निश्‍चित करण्यात आला. यात गव्हाला हेक्टरी ३५ हजार, बागायती हरभऱ्याला २९ हजार, कोरडवाहू हरभऱ्यासाठी २४ हजार, करडईसाठी २७ हजार, उन्हाळी भुईमुगासाठी ३८ हजार तर कांदा पिकाला हेक्टरी ७३ हजार रुपये मिळू शकणार आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...