सांगली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची गती वाढेना

सांगली जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर ऊस पीक घेतले जाते. त्यामुळे आडसाली ऊस लागवडीसाठी कर्ज वाटप सुरु झाले आहे. हे कर्जवाटप सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचे असून जूलै महिन्यातच कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. - नीळकंठ करे,जिल्हा उपनिबंधक, सांगली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याची गती वाढलेली दिसत नाही. शनिवारअखेर (ता.६) ४६१ कोटी ९० लाखांचे म्हणजे ३० टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले. कर्ज वाटपास गती कधी येणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. कर्ज नवे-जुने झाले नसल्याने खरीप पेरणी सुरु होऊन देखील नव्याने पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

जिल्ह्यासाठी खरीप हंगामात १ हजार ५५८ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कर्ज वाटपास प्रारंभ झाला आहे. सुरवातीपासूनच कर्ज वाटपास गती नसल्याने शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. बॅंकांनी कर्ज वाटपास प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ज्या बँका वेळेत कर्ज पुरवठा करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तरी देखील बँकाकडून कर्ज वाटपास विलंब होत असल्याचे दिसते आहे.

वास्तविक पाहता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १७ टक्के कर्ज वाटप झाले होते. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात २४ टक्के कर्ज वितरित करण्यात आले. दरम्यान कर्ज वाटपाची गती कमीच आहे. २८ मे अखेर २८ टक्के कर्ज वाटप झाले होते. जिल्हा बँकेकडून ३२० कोटी २८ लाख तर इतर बँकेकडून १४१ कोटी ५२ लाख असे एकूण ४६१ कोटी ९० लाखांचे म्हणजे ३० टक्के कर्जवाटप झाले आहे. पंधरा दिवसांत कर्ज वाटपाचा आकडा चार टक्क्यांनी वाढला आहे.    अशी आहे पीककर्ज वाटप स्थिती

  • कर्ज वाटपाचे उद्दिष्ट : १ हजार ५५७ कोटी
  • जिल्हा बँकेने केलेले कर्ज वाटप : ३२० कोटी २८ लाख
  • इतर बँकांनी केलेले कर्ज वाटप १४१ कोटी ५२ लाख
  • पीक कर्ज वाटपाची गती संथ असण्याची कारणे

  • आडसाली ऊस लागवड जुलैत होत असल्याने पीककर्जास सध्या मागणी कमी
  • द्राक्षासाठी कर्जमागणी आॅगस्टपासून होणार
  • अनेक भागात कर्ज नवे-जुने झालेले नाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com