मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरण

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खरिपासाठी जूनअखेर उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २२ टक्के पीककर्ज वितरण झाले होते. त्यात जुलैच्या पहिल्या आठवड्याअखेर चार टक्क्यांनी भर पडून हा पीककर्ज पुरवठा २६ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खरिपासाठी जूनअखेर उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २२ टक्के पीककर्ज वितरण झाले होते. त्यात जुलैच्या पहिल्या आठवड्याअखेर चार टक्क्यांनी भर पडून हा पीककर्ज पुरवठा २६ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला आहे.

मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका व ग्रामीण बँकांना चालू खरीप हंगामासाठी ११ हजार ९०४ कोटी ४४ लाख ७ हजार रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या तुलनेत विविध बँकांनी ६ जुलै अखेर मराठवाड्यातील ३ लाख ३६ हजार २९३ हेक्टर क्षेत्रासाठी ६ लाख १५ हजार ३८ शेतकऱ्यांना ३११० कोटी ९१ लाख ३९ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करत २६.१३ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. या उद्दिष्टपूर्तीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आघाडी होती.

आठही जिल्ह्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना २ हजार १०१ कोटी ६५ लाख ६८ हजार रुपयांचे पीककर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत सर्व बँकांनी ४,३१,५१९ शेतकऱ्यांना १५१८ कोटी ६२ लाख १४ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करीत ७२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. 

मराठवाड्यातील व्यापारी बँकांना सर्वाधिक ८ हजार १६६ कोटी ५ लाख ६५ हजार रुपयांचे पीककर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु या बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करण्यात हात आखडता घेतला आहे. या बँकांनी केवळ १२ टक्के उद्दिष्टपूर्ती करताना १ लाख १ हजार ५२१ शेतकऱ्यांना ९८५ कोटी ७० लाख ७२ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे. ग्रामीण बँकेने १६३६ कोटी ७२ लाख ७४ हजार रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत ८२ हजार ९३८ शेतकऱ्यांना ६०६ कोटी ५८ लाख ५३ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करीत ३७ टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.   औरंगाबाद जिल्ह्याची आघाडी  शेतकऱ्यांना खरिपासाठी पीककर्ज वितरित करण्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सहकारी, व्यापारी व ग्रामीण बँकांनी तूर्त आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांना ११९६ कोटी ८० लाख रुपयांचे पीककर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत सर्व बँकांनी १ लाख ४ हजार २८८ शेतकऱ्यांना ४९६ कोटी ८५ लाख १४ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित ४१.५१ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५०.८१ टक्के उद्दिष्टपूर्ती करताना ७१ हजार ८१० शेतकऱ्यांना २०८ कोटी ९५ लाख ३२ हजार रुपयांचा पीककर्ज पुरवठा केला. त्यापाठोपाठ व्यापारी बँकांनी ६७१ कोटी ७६ लाख रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत २१ हजार ९३५ शेतकऱ्यांना २०१ कोटी ६८ लाख ५७ हजार रुपयांचे पीककर्ज वितरण करीत ३० टक्के उद्दिष्ट गाठले. ग्रामीण बँकेने ११३ कोटी ७९ लाख २० हजार रुपये या पीककर्ज पुरवठ्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ७५.७६ टक्के उद्दिष्टपूर्ती करताना १०, ५४३ शेतकऱ्यांना ८६ कोटी २१ लाख २५ हजार रुपयांचा पीककर्ज पुरवठा केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेंडे यांनी दिली.

जिल्हानिहाय उद्दिष्ट व कर्जपुरवठा (रुपये, कोटी)

  • औरंगाबाद जिल्हा
  • उद्दिष्ट  : ११९६ कोटी ८० लाख
  • कर्जपुरवठा : ४९६ कोटी ८५ लाख १४ हजार
  • टक्केवारी  :   ४१.५१
  • जालना जिल्हा
  • उद्दिष्ट  :  १११५ कोटी ३१ लाख ९० हजार
  • कर्जपुरवठा : ३१७ कोटी ४६ लाख ३१ हजार
  • टक्केवारी  :  २८.४६
  • परभणी जिल्हा
  • उद्दिष्ट  : १५६७ कोटी २० लाख
  • कर्जपुरवठा  : २७४ कोटी ९३ लाख ५९ हजार
  • टक्केवारी  :  १७.५४
  • हिंगोली जिल्हा
  • उद्दिष्ट  : १ हजार १६८ कोटी ९५ लाख
  • कर्जपुरवठा  : १९८ कोटी २३ लाख ९९ हजार
  • टक्केवारी : १६.९६
  •   लातूर जिल्हा 
  • उद्दिष्ट  : २२८३ कोटी ९४ लाख 
  • कर्जपुरवठा : ८५७ कोटी ७३ लाख ९४ हजार
  • टक्केवारी : ३७.५६
  • उस्मानाबाद जिल्हा 
  • उद्दिष्ट : १५९० कोटी ५५ लाख ४७ हजार 
  • कर्जपुरवठा : ४०८ कोटी ६० लाख १५ हजार
  • टक्केवारी : २५.६९
  • बीड जिल्हा 
  • उद्दिष्ट : ९५० कोटी 
  • कर्जपुरवठा : २३७ कोटी २६ लाख ७४ हजार 
  • टक्केवारी : २४.९८
  • नांदेड जिल्हा 
  • उद्दिष्ट  : २०३१ कोटी ६७ लाख ७० हजार 
  • कर्जपुरवठा  : ३१९ कोटी ८१ लाख ५३ हजार
  • टक्केवारी : १५.७४ टक्के
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com