Farmer Agricultural News crop loan distribution status Aurangabad Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरण

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खरिपासाठी जूनअखेर उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २२ टक्के पीककर्ज वितरण झाले होते. त्यात जुलैच्या पहिल्या आठवड्याअखेर चार टक्क्यांनी भर पडून हा पीककर्ज पुरवठा २६ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खरिपासाठी जूनअखेर उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ २२ टक्के पीककर्ज वितरण झाले होते. त्यात जुलैच्या पहिल्या आठवड्याअखेर चार टक्क्यांनी भर पडून हा पीककर्ज पुरवठा २६ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला आहे.

मराठवाड्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका व ग्रामीण बँकांना चालू खरीप हंगामासाठी ११ हजार ९०४ कोटी ४४ लाख ७ हजार रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या तुलनेत विविध बँकांनी ६ जुलै अखेर मराठवाड्यातील ३ लाख ३६ हजार २९३ हेक्टर क्षेत्रासाठी ६ लाख १५ हजार ३८ शेतकऱ्यांना ३११० कोटी ९१ लाख ३९ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करत २६.१३ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. या उद्दिष्टपूर्तीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची आघाडी होती.

आठही जिल्ह्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना २ हजार १०१ कोटी ६५ लाख ६८ हजार रुपयांचे पीककर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत सर्व बँकांनी ४,३१,५१९ शेतकऱ्यांना १५१८ कोटी ६२ लाख १४ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करीत ७२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. 

मराठवाड्यातील व्यापारी बँकांना सर्वाधिक ८ हजार १६६ कोटी ५ लाख ६५ हजार रुपयांचे पीककर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु या बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा करण्यात हात आखडता घेतला आहे. या बँकांनी केवळ १२ टक्के उद्दिष्टपूर्ती करताना १ लाख १ हजार ५२१ शेतकऱ्यांना ९८५ कोटी ७० लाख ७२ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित केले आहे. ग्रामीण बँकेने १६३६ कोटी ७२ लाख ७४ हजार रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत ८२ हजार ९३८ शेतकऱ्यांना ६०६ कोटी ५८ लाख ५३ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करीत ३७ टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.
 
औरंगाबाद जिल्ह्याची आघाडी
 शेतकऱ्यांना खरिपासाठी पीककर्ज वितरित करण्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सहकारी, व्यापारी व ग्रामीण बँकांनी तूर्त आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांना ११९६ कोटी ८० लाख रुपयांचे पीककर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत सर्व बँकांनी १ लाख ४ हजार २८८ शेतकऱ्यांना ४९६ कोटी ८५ लाख १४ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित ४१.५१ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५०.८१ टक्के उद्दिष्टपूर्ती करताना ७१ हजार ८१० शेतकऱ्यांना २०८ कोटी ९५ लाख ३२ हजार रुपयांचा पीककर्ज पुरवठा केला. त्यापाठोपाठ व्यापारी बँकांनी ६७१ कोटी ७६ लाख रुपये उद्दिष्टाच्या तुलनेत २१ हजार ९३५ शेतकऱ्यांना २०१ कोटी ६८ लाख ५७ हजार रुपयांचे पीककर्ज वितरण करीत ३० टक्के उद्दिष्ट गाठले. ग्रामीण बँकेने ११३ कोटी ७९ लाख २० हजार रुपये या पीककर्ज पुरवठ्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ७५.७६ टक्के उद्दिष्टपूर्ती करताना १०, ५४३ शेतकऱ्यांना ८६ कोटी २१ लाख २५ हजार रुपयांचा पीककर्ज पुरवठा केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेंडे यांनी दिली.

जिल्हानिहाय उद्दिष्ट व कर्जपुरवठा (रुपये, कोटी)

 • औरंगाबाद जिल्हा
 • उद्दिष्ट  : ११९६ कोटी ८० लाख
 • कर्जपुरवठा : ४९६ कोटी ८५ लाख १४ हजार
 • टक्केवारी  :   ४१.५१
 • जालना जिल्हा
 • उद्दिष्ट  :  १११५ कोटी ३१ लाख ९० हजार
 • कर्जपुरवठा : ३१७ कोटी ४६ लाख ३१ हजार
 • टक्केवारी  :  २८.४६
 • परभणी जिल्हा
 • उद्दिष्ट  : १५६७ कोटी २० लाख
 • कर्जपुरवठा  : २७४ कोटी ९३ लाख ५९ हजार
 • टक्केवारी  :  १७.५४
 • हिंगोली जिल्हा
 • उद्दिष्ट  : १ हजार १६८ कोटी ९५ लाख
 • कर्जपुरवठा  : १९८ कोटी २३ लाख ९९ हजार
 • टक्केवारी : १६.९६
 •  लातूर जिल्हा 
 • उद्दिष्ट  : २२८३ कोटी ९४ लाख 
 • कर्जपुरवठा : ८५७ कोटी ७३ लाख ९४ हजार
 • टक्केवारी : ३७.५६
 • उस्मानाबाद जिल्हा 
 • उद्दिष्ट : १५९० कोटी ५५ लाख ४७ हजार 
 • कर्जपुरवठा : ४०८ कोटी ६० लाख १५ हजार
 • टक्केवारी : २५.६९
 • बीड जिल्हा 
 • उद्दिष्ट : ९५० कोटी 
 • कर्जपुरवठा : २३७ कोटी २६ लाख ७४ हजार 
 • टक्केवारी : २४.९८
 • नांदेड जिल्हा 
 • उद्दिष्ट  : २०३१ कोटी ६७ लाख ७० हजार 
 • कर्जपुरवठा  : ३१९ कोटी ८१ लाख ५३ हजार
 • टक्केवारी : १५.७४ टक्के

इतर अॅग्रो विशेष
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...
अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर भर नवी दिल्ली: शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी...
रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा...नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा पुणे ः पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, मध्य...
चीनकडून बियाणे दहशतवादाचा धोका पुणेः देशातील बियाणे वारसा आणि बीजोत्पादन उद्योग...
बेकायदा ‘एचटीबीटी’मुळे तीनशे कोटींचा...पुणे : बेकायदेशीर तणनाशक सहणशील (एचटीबीटी) कापूस...
कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे....