कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील पिके संकटात

कोल्हापूर : हमखास पाऊस असणाऱ्या जिल्ह्यातील पश्चिम भागातील पिके आता पावसाअभावी संकटात आली आहेत. ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी उपसा पंप लावून पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
उगवून आलेले भात पीक पावसाअभावी असे वाळून जात आहे.
उगवून आलेले भात पीक पावसाअभावी असे वाळून जात आहे.

कोल्हापूर : हमखास पाऊस असणाऱ्या जिल्ह्यातील पश्चिम भागातील पिके आता पावसाअभावी संकटात आली आहेत. ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी उपसा पंप लावून पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. 

या भागात महिनाभरापूर्वी पेरणी केलेले नागली पीक पावसामुळे पूर्णपणे वाळून गेले आहे.  भात टोकणीचीही अवस्था फार दयनीय झाली आहे. शेकडो हेक्टरवरील नागली पिकाबरोबर भातशेतीही अडचणीत आली आहे. हमखास पाऊस असणाऱ्या राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी नुकतीच केलेली ऊस रोप लागवड ही पावसाअभावी अडचणीत आली आहे

सुरुवातीच्या नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. पण पेरणीनंतर मात्र पावसाने दडी मारली. इंजिन, मोटारपंपांच्या साहाय्याने रोपे लागवड केली. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक ठिकाणी केवळ ढगाळ हवामान आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील लागवड केलेल्या रोपांबरोबर भात टोकण व नाचणी पिकाचे पावसाअभावी मोठे नुकसान होत आहे. सध्या नाचणी, भात टोकण, मिरची, भुईमूग यासारखी पिके सुकत आहेत. 

जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै अखेर झालेला एकूण पाऊस (मिमी) ः हातकणंगले २१२.३८, शिरोळ- १९५, पन्हाळा- ६०२.१४,  शाहूवाडी-८८७.१७ , राधानगरी-८८२.१७ , गगनबावडा-   २३८२.५०, करवीर-४६१.२७ , कागल-६१२.५७, गडहिंग्लज-४४९.१४, आजरा-९९२, चंदगड-९१२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com