निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात ७८७४ हेक्टरवर नुकसान 

निसर्ग चक्रीवादळामुळे बहुतांशी तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये भाजीपाला, उन्हाळी बाजरी, मका आणि फळपिकांचा समावेश आहे. ही नजरअंदाज माहिती असून पंचनामे झाल्यानंतर नेमकी माहिती समोर येईल. त्यासाठी लवकरच पंचनामे सुरू केले जातील. - बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे
चक्रीवादळ, पावसाने झालेले पीक नुकसान
चक्रीवादळ, पावसाने झालेले पीक नुकसान

पुणे  ः निसर्ग चक्रीवादळ आणि अति पावसाचा पुणे जिल्ह्यातील ३७१ गावांना फटका बसला आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे एकूण ७ हजार ८७४.४२ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे जिल्ह्यातील २८ हजार ४९६ शेतकऱ्यां‍ना आर्थिक फटका बसला असल्याचे नजर अंदाज अहवालावरून समोर आले आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनी पुणे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीबाबत नजर अंदाजाद्वारे माहिती घेतली. त्यावरून  ही माहिती पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिरायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान नसले तरी बागायती क्षेत्रातील ७८७४ हेक्टरवरील पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जिल्ह्यात पंचनामे सुरू झालेले नाही. पंचनामे झाल्यास या नुकसानीची नेमकी माहिती समोर येईल. त्यानंतर पंचनाम्याचा अहवाल शासनाला सादर करून नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात उन्हाळी पिके व भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र आहे. त्यापैकी मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, हवेली, पुरंदर तालुक्यातील अनेक भागांत कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालामध्ये इंदापूर, जुन्नर, आंबेगाव,  खेड, मावळ, मुळशी, शिरूर या तालुक्यातील ३७१ गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.

यामध्ये उन्हाळी बाजरी, कांदा, मका, द्राक्षे, डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान फळपिकांचे झाले आहे. सुमारे २९०६.१० हेक्टरवरील फळ पिकांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यापाठोपाठ २६९२.७२ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ५७२.५० हेक्टरवरील उन्हाळी बाजरीचे, ५७४.६५ हेक्टरवरील मका पिकाचे नुकसान झाले आहे.   

वादळी पावसामुळे तालुकानिहाय झालेले नुकसान (हेक्टर) 
तालुका गावांची संख्या शेतकरी संख्या झालेले एकूण नुकसान
इंदापूर ३४ २१.६५ 
जुन्नर १४५ २२,९६० ५७३५
शिरूर १६ ४६ ३३.१६ 
आंबेगाव ९१ ३६३१ १३२३ 
खेड ९६ १६६६ ६३८.८
मावळ १२ ११० ८१.४५
मुळशी ४९ ४१.२ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com