Farmer Agricultural News crops damage due to flood Gadchiroli Maharashtra | Agrowon

पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २० हजार हेक्टरला फटका

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

गडचिरोली ः जिल्ह्यात पुरामुळे २०,२३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. 

गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी सोडल्यामुळे सहा तालुक्यांतील धान व इतर पिके पाण्याखाली गेली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने सर्वेक्षण व पंचनामे करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात पुरामुळे २०,२३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. 

मध्यप्रदेशातील संजय सरोवर व गोसीखुर्द धरणाचे पाणी २८ ऑगस्टपासून सोडण्यात आले. गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठा विसर्ग होता. या पुराचा फटका देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, सिरोंचा व चामोर्शी या तालुक्यांना बसला. या सहा तालुक्यातील खरीप हंगामातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. काही घरांची पडझड झाली. तसेच पशुधन मृत्युमुखी पडले. गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील प्रमुख दहा मार्ग चार दिवस बंद होते.

परिणामी वाहतूक ठप्प झाली होती. शेतकरी, व्यावसायिक, पशुपालक या सर्वांना पुराचा फटका बसला. प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्रात सर्वेक्षण पंचनामे करण्यात आले.   या नुकसानीच्या भरपाईपोटी २३ कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. 
 
दोन हजार कोंबड्या मृत्युमुखी
गोसेखुर्द धरणातून पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी या तीन तालुक्यांत २११३ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. त्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३१०, मुलचेरातील १२४५ व आरमोरी तालुक्यातील ५५८ कोंबड्यांचा समावेश आहे.  याशिवाय दहा दुधाळ जनावरे दगावली तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
 

असे आहे नुकसान (हेक्टर)

  • गडचिरोली : ६०७४.८६
  • चामोर्शी : ४०६१.०८
  • मुलचेरा : २७.८५
  • देसाईगंज : २४८६.६७
  • आरमोरी : ४८४९.०४
  • अहेरी : १०५५.१७
  • सिरोंचा : १६८६.५८

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...