Farmer Agricultural News crops damage due to flood Parbhani Maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखाली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

परभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील विसर्गामुळे गोदावरीस पूर आला आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी काठाच्या गाव शिवारातील हजारो एकर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतजमिनी जलमय झाल्या. यामुळे खरीप पिकांचे अपरिमित नुकसान झाले. 

परभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील विसर्गामुळे गोदावरीस पूर आला आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी काठाच्या गाव शिवारातील हजारो एकर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतजमिनी जलमय झाल्या. यामुळे खरीप पिकांचे अपरिमित नुकसान झाले. 

जायकवाडी तसेच माजलगाव धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली. गंगाखेड, सोनपेठ, मानवत, पालम तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्कही काही काळ तुटला होता. गंगाखेड येथील मंदिरे पाण्याखाली गेली आणि स्मशानभूमीलाही पाण्याचा वेढा पडला. अनेक शेतांमध्ये गोदावरीचे बॅकवॉटर शिरल्याने शेतांचे रूपांतर तळ्यांमध्ये झाले आहे.

या शेतांमधील पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतांमध्ये तर तराफ्यांवरून मासेमारी होत असतानाचे चित्र दिसून आले. गोदाकाठावरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव, सुशांत चौधरी यांनी भेटी घेत शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष संजय सोनटक्के, प्रदीप चौधरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया 
पुराने हाती आलेली पिके हिरावून घेतली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने आर्थिक मदत द्यावी.
- गोपाळ चौधरी, साबेर शेख, शेतकरी. 
 
पूर ओसरल्यानंतर पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्यात यावे.
- गोविंद यादव,तालुका अध्यक्ष,कॉंग्रेस, गंगाखेड.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...