Farmer Agricultural News crops damage due to rain Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. रविवारी (ता.२९) सायंकाळी नगर, राहुरी, पाथर्डी, नेवासा भागात जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसाने मोठे नुकसान होत आहे. पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी, धारवाडी परिसरात अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे नुकसान झाले.

नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. रविवारी (ता.२९) सायंकाळी नगर, राहुरी, पाथर्डी, नेवासा भागात जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसाने मोठे नुकसान होत आहे. पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी, धारवाडी परिसरात अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे नुकसान झाले.

नगर, पारनेर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव या तालुक्यांत गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. आधीच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्या, आठवडे बाजार बंद असल्याने भाजीपाला, फळे, धान्य विक्री करण्याला अडचणी निर्माण झालेल्या असताना चार दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट उभे राहिल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. काढणीला आलेला व काढणी केलेला गहू, कांदा, चारा पिके, फळे, द्राक्ष, उन्हाळी बाजरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पावसामुळे होत आहे.

रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने धारवाडी (ता. पाथर्डी) येथील गिते वस्तीवरील सचीन गिते, जालिंदर गिते, बाबासाहेब सोनवणे, मनोज आव्हाड, जनाबाई काळापहाड, नवनाथ रणसिंग, विनायक गोरे, महादेव रणसिंग, नारायण रणसिंग, नवनाथ रणसिंग, राहुल गंडाळ यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन या शेतकरी कुटूंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, उपसरपंच उद्धव काळापहाड यांनी केली आहे. जिल्हाभरात अवकाळी पावसाने आतापर्यंत तीन बळी गेले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या...पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते...
माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः...अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच...
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...