सोलापुरात अवकाळी पावसाची पुन्हा हजेरी

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१०) दुपारी चार आणि नंतर रात्री साडेआठच्या सुमारास काही भागात अचानकपणे पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काढणी सुरु असलेल्या रब्बी पिकांना फटका बसला तर कांदा, द्राक्ष उत्पादकांची धांदल उडाली. करमाळा, उत्तर सोलापूर, सांगोला, माढा भागात प्रामुख्याने या पावसाने हजेरी लावली. सांगोल्यात काही भागात गारा पडल्या.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१०) दुपारी चार आणि नंतर रात्री साडेआठच्या सुमारास काही भागात अचानकपणे पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काढणी सुरु असलेल्या रब्बी पिकांना फटका बसला तर कांदा, द्राक्ष उत्पादकांची धांदल उडाली. करमाळा, उत्तर सोलापूर, सांगोला, माढा भागात प्रामुख्याने या पावसाने हजेरी लावली. सांगोल्यात काही भागात गारा पडल्या. 

जिल्ह्यात पाच-सहा दिवसांपूर्वी हलक्या स्वरुपात पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारी पुन्हा त्याने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसात तापमानही उच्चांकी आहे. कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. उकाडाही प्रचंड जाणवत होता. पण शुक्रवारी पावसाचे वातावरण नव्हते. पण सायंकाळी सहानंतर वातावरणात एकदम बदल झाला. रात्री साडेआठच्या सुमारास सोसाट्याच्या वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास त्याची रिपरिप सुरु होती. यामुळे काढणी सुरु असलेल्या ज्वारी, गहू उत्पादकांसह कांदा आणि द्राक्ष उत्पादकांची धांदल उडाली.

आधीच ‘कोरोना’च्या संकटामुळे शेतीमालाला उठाव नाही, त्यात या पावसामुळे पुन्हा शेतकऱ्यांची अडचण वाढली. काही भागात भाजीपाल्यालाही फटका बसला. दुपारी चारच्या सुमारास सांगोल्यातील मांजरी, संगेवाडी, मेथवडे, वाढेगाव, वाटंबरे, चिणके, अजनाळे परिसरात पाऊस झाला. या भागातील काही द्राक्षबागांना फटका बसला. बेदाण्यासाठी शेडवर टाकलेल्या द्राक्षांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. माढा आणि करमाळ्यातील पांडे हिसरे, फिसरे, अर्जूननगर, म्हसेवाडी, हिवरे, शेलगाव भागातही पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह पाऊस आल्याने काढणी सुरु असलेल्या कांदा, मका, ज्वारीचे नुकसान झाले. काही ठिकाणी कडब्याच्या गंजीही वाऱ्यामुळे विस्कटून गेल्या. उत्तर सोलापुरातही नान्नज, कारंबा, मार्डी, गुळवंची परिसरात पावसामुळे कांदा उत्पादकांची धांदल उडाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com