Farmer Agricultural News Cyclone form in Arabian sea Pune Maharashtra | Agrowon

महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ‘निसर्ग’ चक्रीवादळ होणार तयार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

पुणे  : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने आज (ता.२) महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ‘निसर्ग’ चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. 

पुणे  : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असल्याने आज (ता.२) महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ‘निसर्ग’ चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. ताशी ११० ते १२५ किलोमीटर चक्राकार वारे वाहत असलेले हे चक्रीवादळ उद्या (ता.३) दुपारपर्यंत रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्‍वर आणि दमण दरम्यान किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत हवेच्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्यानंतर ही प्रणाली उत्तरेकडे महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. सोमवारी (ता.२) दुपारी ही प्रणाली गोव्याच्या पणजीपासून ३४० किलोमीटर, मुंबईपासून ६३० किलोमीटर, तर गुजरातच्या सुरतपासून ८५० किलोमीटर नैर्ऋत्येला होती. या कमी दाब क्षेत्राचे केंद्र ताशी १३ किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. आज (ता.२) अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

या वादळामुळे उद्या (ता.२) महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत रायगड, मुंबई, पालघर ठाणे जिल्ह्यात ताशी ११५ ते १२५ किलोमीटर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रासह कर्नाटक,गुजरातच्या किनाऱ्यालगत समुद्रात अतिउंच लाट उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीलगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचनाही देण्यात आला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
अरबी समुद्रात असलेल्या वादळी प्रणालीमुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ढगांची दाटी झाली आहे. राज्यात गुरूवारपर्यंत (ता.४) पर्यंत पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात आज (ता.२) जोरदार वारे वाहून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...