Farmer Agricultural News Demand for action against those who do not implement the order to replace the seeds Akola Maharashtra | Agrowon

बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

शासनाने शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे आदेश दिलेले असतानाही स्थानिक प्रशासन याबाबत गंभीर नाही. त्यामुळे दोषींविरुद्ध कारवाईची मागणी संघटनेने केली आहे.
-विनायक सरनाईक, जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना, बुलडाणा.

अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी आदेश दिले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना बियाणे मिळाले नाही. त्यामुळे आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या ‘महाबीज’वर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने कृषिमंत्र्यांकडे केली. 

याबाबत विनायक सरनाईक यांनी तक्रार केली. त्यांनी म्हटले की, चिखली तालुक्यात शेतकऱ्यांनी लागवड केलेले सोयाबीन बियाणे उगवले नाही, याबाबत तक्रार करूनही  शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात आले नाही. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. काही शेतकऱ्यांकडे बियाणे घेण्याची व्यवस्था नसल्याने त्यांची पेरणी रखडली. महाबीजचे बियाणे उगवले नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.

या तक्रारींची दखल घेत कृषी विभागाच्या अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे बदलून दिले गेले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अवर सचिवांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी.
 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...