Farmer Agricultural News Demand to cover pan farms under crop insurance Akola Maharashtra | Agrowon

पानपिंपरी, विड्याच्या पानाला पीकविम्याच्या कक्षेत आणण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे पीक विम्याच्या कक्षेत आणून या उत्पादकांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जावा, अशी मागणी अमरावती विभागातील या शेतकऱ्यांनी शासनाकडे केली.

बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे पीक विम्याच्या कक्षेत आणून या उत्पादकांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जावा, अशी मागणी अमरावती विभागातील या शेतकऱ्यांनी शासनाकडे केली. या अनुषंगाने सोमवारी (ता.२८) प्रत्येक जिल्ह्यात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अमरावती विभागात सर्व जिल्ह्यात विड्याच्या पानांचे उत्पादन केले जाते. बुलडाणा जिल्ह्यात सोगोडा, वडगाव वाण, वारखेड, उमरा पानाचे, एकलारा, वरवट बकाल, लाडणापूर, सोनाळा, वानखेड, शेगाव, जलंब, जळगाव जामोद, सुनगाव, पिंपळगाव काळे, चारठाणा, मोताळा, मासरुळ, चिखली, अकोला जिल्हयात दानापूर, वारखेड, सोनवाडी, हिवरखेड, खंडाळा, अडगाव बुद्रूक, खुर्द, अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सूर्जी, पांढरी, अचलपूर, शिरजगाव, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड अशा विविध गावांमध्ये पानमळे व पानपिंपरीचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही वेलवर्गीय पिकांवर दरवर्षी विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. सर्व भागांत ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर त्याचे उत्पादन केले जाते. या पानांना मोठी मागणी असून देशभर त्याची विक्री केली जाते.

शेतकरी स्वमालकीच्या तसेच भाडेपट्ट्याने शेती करून त्यावर पानपिंपरीची लागवड करतात. गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्ती, किडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे या पिकाचे नुकसान होत आहे. मात्र, कृषी विभाग, कृषी विद्यापीठाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कुठलेही मार्गदर्शन केले जात नाही.

मागील दोन-तीन वर्षात झालेल्या नुकसानामुळे आठ पानपिंपरी उत्पादकांनी आत्महत्यासुद्धा केल्या. आयुष मंत्रालयाकडून पानपिंपरीला अनुदान देय आहे. परंतु औषधी वनस्पती मंडळ व कृषी विभागाच्या अनुदान वाटपाच्या किचकट पद्धतीनेमुळे अनेक शेतकरी अनुदानापासून दूरच आहेत.
 
  या आहेत मागण्या

  • पानपिंपरी व विड्याचे पान पेरेपत्रकातील पिकांच्या यादीत समाविष्ट करावे.
  • पानमळा व पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
  • या पिकास देय असलेले अनुदान वितरणाची प्रक्रिया सुटसुटीत करावी.
  • पीक साठवणूक, वाळवणी, प्रतवारी, पॅकेजिंग यासाठी वरवट बकाल, जळगाव जामोद, अकोट, अंजनगाव सूर्जी या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात.
  • या पिकांची कृषी विभागाकडून जिओ टॅगिंग केले जावे.
  • दिवठाणा येथील संशोधन केंद्राला पुरेसा कर्मचारी वर्ग, निधी देऊन या पिकांच्या संशोधनाचे काम पुढे नेले जावे.

इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...