Farmer Agricultural News demand to doing panchanama of damaged crops Nagar Maharashtra | Agrowon

‘अवकाळी’मुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करा ः विखे पाटील

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

नगर : नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महसूल व कृषी विभागाला द्यावेत, अशी मागणी माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

नगर : नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महसूल व कृषी विभागाला द्यावेत, अशी मागणी माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे गांभीर्य आमदार विखे पाटील यांनी मुख्य सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आकडेवारीसह निदर्शनास आणून दिले आहे. राहाता तालुक्‍यात मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने ३ हजार ३७४ हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ११२५ हेक्‍टर क्षेत्रावरील गव्हाचे, ३४७ हेक्‍टरवरील हरभऱ्याचे, ३७५ हेक्‍टरवरील कांद्याचे, ४२ हेक्‍टरवरील मक्याचे, २२५ हेक्‍टरील द्राक्षांचे आणि ११२५ हेक्‍टरवरील डाळिंबाचे नुकसान झाल्याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

सद्यःस्थितीत ‘कोरोना’च्या जागतिक संकटाशी सामना करताना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उत्पादित शेतीमाल बाजारात विक्रीसाठी आणणे मुश्‍कील झाले असून, कवडीमोलाने तो विकण्याची वेळ आली आहे. त्यातच आता या अवकाळी पावसाने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.

या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची गरज असून पंचनामे लवकर पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा मार्ग मोकळा होणार असल्याने महसूल आणि कृषी विभागाने समन्वयाने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...