Farmer Agricultural News demand to give extension for farmers accidentenal insurance scheme Pune Maharashtra | Agrowon

शेतकरी अपघात विमा योजनेला मुदतवाढ द्या : खासदार डॉ. अमोल कोल्हे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 एप्रिल 2020

मंचर, जि. पुणे   ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रस्ताव कृषी विभागाकडून सादर होऊ शकले नाहीत, त्यामुळे या विमा योजनेला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

मंचर, जि. पुणे   ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रस्ताव कृषी विभागाकडून सादर होऊ शकले नाहीत, त्यामुळे या विमा योजनेला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

राज्य शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत असंख्य शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केल्यापासून कृषी विभागाकडे सादर केलेले शेतकऱ्यांचे प्रस्ताव अद्याप कृषी विभागाकडेच पडून आहेत. हे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवले न गेल्यास शेतकऱ्यांना अपघात विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

या संदर्भात शेतकऱ्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्याशी संपर्क साधून विमा योजनेला मुदतवाढ देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...