Farmer Agricultural News Demand to give interest free loan to farmers Nagar Maharashtra | Agrowon

खरिपासाठी हेक्‍टरी २५ हजारांचे बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

नगर   ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी प्रति हेक्टर २५ हजार रूपयांचे बिनव्याजी कर्ज द्यावे, तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बियाणे व खते कृषी विभागाच्या माध्यमातून थेट बांधावर उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नगर   ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी प्रति हेक्टर २५ हजार रूपयांचे बिनव्याजी कर्ज द्यावे, तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बियाणे व खते कृषी विभागाच्या माध्यमातून थेट बांधावर उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष संजय दळे पाटील, कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अतिवृष्टीमुळे मागीलवर्षी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात पीकविमा भरून घेण्यासाठी कंपनी पुढे न आल्याने विमा मिळण्याचीही शक्यता नाही. राज्य शासनाने या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना विनाअट बिनव्याजी हेक्टरी २५ हजार रुपयांचे कर्ज बँकेमार्फत तत्काळ उपलब्ध करून द्यावे.

तसेच खते, बियाणांची विक्री सुरु झाल्यानंतर दरवर्षीचा अनुभव पाहता कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होऊ शकते, गर्दीमुळे शेतकऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका संभवतो. हे सर्व टाळण्यासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर कृषी विभागाच्या माध्यमातून खते, बियाणे उपलब्ध करून द्यावे. खरीप हंगामाच्या पेरणीला अजून १ महिन्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक आहे. यासाठी वेळीच योग्य पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी श्री. देवसरकर यांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...