Farmer Agricultural News Demand to start goat and sheep market Nagar Maharashtra | Agrowon

शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात ग्रामीण भागात शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी विक्रीतून आठवडी बाजारात व्यवहार होतात. यंदा मात्र ‘कोरोना’मुळे हे व्यवहार बंद आहेत. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून हे नुकसान टाळण्यासाठी ‘कोरोना’बाबतचे सर्व नियम पाळून राज्यात शेळ्या-मेंढ्यांचे खरेदी - विक्री व्यवहार सुरु करावेत, अशी मागणी नगर जिल्हा शेळीपालन व प्रक्रिया सहकारी संघाचे अध्यक्ष अशोक काळे यांनी केली आहे.  

नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात ग्रामीण भागात शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी विक्रीतून आठवडी बाजारात व्यवहार होतात. यंदा मात्र ‘कोरोना’मुळे हे व्यवहार बंद आहेत. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून हे नुकसान टाळण्यासाठी ‘कोरोना’बाबतचे सर्व नियम पाळून राज्यात शेळ्या-मेंढ्यांचे खरेदी - विक्री व्यवहार सुरु करावेत, अशी मागणी नगर जिल्हा शेळीपालन व प्रक्रिया सहकारी संघाचे अध्यक्ष अशोक काळे यांनी केली आहे.  

काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ग्रामीण भागामध्ये शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीतून शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे आर्थिक व्यवहार होतात. अनेकांचा बाजार हाटही शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीवरच अवलंबून आहे. शेळ्या मेंढ्यांच्या विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होते. आता १६ जुलैला आषाढी अमावस्या व १ ऑगस्टला बकरी ईद आहे. 
या काळात शेळ्या-मेंढ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. दरवर्षी याकालावधीत दरही चांगले मिळतात. महिनाभरात चार ते पाच दिवस हे बाजार भरतात. अनेक शेतकरी आषाढ महिन्यात आणि बकरी ईदच्या कालावधीत शेळ्या-मेंढ्यांची विक्री करता यावी, यासाठी अन्य काळात शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्री करत नाहीत.

आता विक्री करण्याची वेळ आलेली असतानाच ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बाजार बंद असल्याने शेळ्या- मेंढ्या खरेदी-विक्री पूर्णतः बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने आता ‘कोरोना’च्या अनुषंगाने अटींच्या अधीन राहून हे बाजार तातडीने सुरू करावेत, अशी मागणी श्री. काळे यांनी केली आहे.  


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...