Farmer Agricultural News demand for to start mini petrol pump in tribal area Pune Maharashtra | Agrowon

‘दुर्गम आदिवासी भागात मिनी पेट्रोल पंप सुरु करा’

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

पुणे  : दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी ‘मिनी’ किंवा ‘मोबाईल पेट्रोल पंप’ सुरू करावेत, असा प्रस्ताव पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्र सरकारला यापूर्वी सादर केला होता. सध्या ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल अभावी शेतीकामांचा खोळंबा होत आहे, या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाचा विचार करण्याची मागणी होत आहे.

पुणे  : दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी ‘मिनी’ किंवा ‘मोबाईल पेट्रोल पंप’ सुरू करावेत, असा प्रस्ताव पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्र सरकारला यापूर्वी सादर केला होता. सध्या ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल अभावी शेतीकामांचा खोळंबा होत आहे, या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाचा विचार करण्याची मागणी होत आहे.

याबाबत माहिती देताना प्रसाद म्हणाले, की घाट परिसरातील डोंगराळ आदिवासी भागात व्यक्तिगत आणि व्यावसायिक वापराच्या वाहन-यंत्रांचा वापर वाढला आहे. यामध्ये ट्रॅक्टर, डिझेल पंप, हार्वेस्टर, फवारणी पंप, मत्स्यपालन बोटी आदींचा समावेश आहे. या यंत्र-वाहनांकरिता इंधनासाठी आदिवासी शेतकरी-मत्स्यपालन आदींना किमान १५ किलोमीटर अंतरावरील पेट्रोल पंपावर जावे लागते. यामुळे देशाच्या पेट्रोल पंप वाटपाच्या धोरणात बदलाची गरज आहे.’’

 
पुणे जिल्ह्यात १८ पंपांचा प्रस्ताव

दुर्गम भागातील पंपांसाठी जुन्नर, खेड, आंबेगाव,खेड, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांमध्ये पश्‍चिम घाट परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी १८ पंपांचा प्रस्ताव २०१८ मध्ये आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत देण्यात आला आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे पंप सुरु झाले असते तर आता ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमध्येही दुर्गम भागातील शेतकऱ्यांना इंधनाचा सुरळीत पुरवठा झाला असता. योजना देशपातळीवर राबविण्यासाठी धोरणात बदलाची गरज आहे, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...