Farmer Agricultural News demands to purchase maize and wheat as per Minimum base price Jalgaon Maharashtra | Agrowon

शासनाने मका, गव्हाची हमीभावानुसार खरेदी करण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 मे 2020

बाजारात गहू, मक्‍याला हमीभाव मिळत नाही. दुसरीकडे ग्राहकांना अवाजवी दरात धान्याची विक्री सुरू आहे. लॉकडाउनचा गैरफायदा घेतला जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.
- दादाराव पाटील, शेतकरी, पाचोरा, जि.जळगाव.

जळगाव   ः कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाउनचे कारण सांगून बाजार समित्या, खासगी बाजारात अन्नधान्याची शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी केली जात आहे. शासनाने मका व गव्हाची हमीभावानुसार खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

खानदेशात गहू, मक्‍याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. ही लागवड तापी, गिरणा, गोमाई, वाघूर, सुसरी आदी नद्यांच्या लाभक्षेत्रात अधिकची होती. रब्बीचे क्षेत्र अपेक्षेपेक्षा अधिक होते. जळगाव जिल्ह्यात तर २०० टक्‍क्‍यांवर रब्बी पोचला. अर्थातच उत्पादनही बऱ्यापैकी येत आहे. मका, गहू ही प्रमुख रब्बी पिके आहेत. मक्‍याची सुमारे ३५ ते ४० हजार हेक्‍टरवर तर गव्हाचीदेखील सुमारे ४० हजार हेक्‍टरमध्ये पेरणी झाली होती.

परंतु ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे. ही अडवणूक सुरूच राहिली तर शेतकऱ्यांचे नुकसान वाढत जाईल. शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत प्रशासन काम करीत नसल्याची स्थिती आहे. अन्नधान्याची विक्री अधिक दरात व्यापारी, खरेदीदार करीत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना हमीभावही मिळत नाही. यामुळे ग्राहक व शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही लुटालूट बंद व्हावी.

लॉकडाउनमध्ये कामगार, मध्यमवर्गीय अडचणीत आहेत. याचा गैरफायदा जे व्यापारी, मध्यस्थ घेत आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवावे. मक्‍याचे दर १२०० ते १४०० रुपये क्विंटलपर्यंत आहेत. गव्हाची खरेदीदेखील १६०० ते १८०० रुपये क्विंटल या दरात सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी मका, गव्हाची घरी साठवणूक केली आहे. परंतु पुढे खरिपासाठी निधी लागणार आहे. त्यामुळे धान्याची विक्री बाजारात करावी लागेल. या स्थितीत शासनाने हमीभावात गहू, मक्‍याची खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...