Farmer Agricultural News Demonstration of soybean seed germination test Nagpur Maharashtra | Agrowon

नागपूर जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणशक्ती तपासण्याचे प्रात्यक्षिक

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 मे 2020

गावपातळीवर जात शेतकऱ्यांना सोयाबीन उगवणशक्‍ती तपासणीचे प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. त्यामुळे येत्या हंगामात शेतकऱ्यांना घरच्या घरी ते तपासता येईल. लॉकडाउनच्या काळात शेतकरी तांत्रिक माहितीपासून वंचित राहू नये, याकरिता दक्षता घेतली जात आहे.
- मिलिंद शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

नागपूर   ः गेल्या वर्षीच्या हंगामात पावसामुळे सोयाबीन उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्या पार्श्‍वभूमीवर येत्या हंगामात घरचेच सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. त्याकरिता कृषी विभागाकडून नागपूरमध्ये गावोगावी बियाणे उगवणशक्‍ती तपासण्याचे प्रात्याक्षिकही दाखविण्यात येत आहे.

नागपूर विभागात गेल्यावेळी ऐन काढणीच्यावेळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. परिणामी यावेळी बाजारातील सोयाबीन बियाण्याच्या दर्जाविषयी साशंकता व्यक्‍त केली जात आहे. सोयाबीनमध्ये ३३ टक्‍के बियाणे बदलाची शिफारस आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी घरचेच बियाणे वापरतील. या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने गावोगावी जात कृषी सहायकांच्या माध्यमातून बियाण्यांची उगवणशक्‍ती तपासण्यासंदर्भाने जागृतीचे काम हाती घेतले आहे. नागपूरमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांच्या मार्गदर्शनात या कामाला गती देण्यात आली आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...