पोषण आहारातील भ्रष्टाचाराची चौकशी करा : फडणवीस

चीनमधून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकची फुले भारतात येत आहेत. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अशा प्रकाराची फुले भारतात आणणाऱ्यांवर कारवाई करावी. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यात शालेय पोषण आहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, व्यापारी आणि अधिकाऱ्यांचे सेटिंग सुरू आहे. त्यामुळे पाच वेळा निविदेचे शुद्धिपत्रक काढून दर बदलण्यात आले, याची फॉरेन्सिक चाचणी करून चौकशी आणि कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. 

शनिवारी (ता. १४) अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेवेळी ते बोलत होते. श्री. फडणवीस म्हणाले, की शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचार मंत्री बच्चू कडू यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सांगितला आहे. या सर्वांची चौकशी करायला हवी. मुंबईतील दोन व्यापारी बसून सेटिंग करतात. तुम्हाला हवे असल्यास त्यांची नावेही देतो, ५ वेळा मुदतवाढ आणि दर बदलण्यात आले. या प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट करायला हवे, असे श्री. फडणवीस म्हणाले.

आश्रमशाळांमधील वस्तू खरेदीतही कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. धानखरेदीतही मोठा भ्रष्टाचार सुरू झाला आहे. क्षमता नसलेल्या गोदामांना त्यापेक्षा तीन पट अधिक नियतन देण्यात आले. राईस मिल मालकांच्या पत्रांवर मंत्र्यांनी उचित सहकार्य करावे, असा शेरा दिला आहे, त्याला नको इतके सहकार्य करण्यात आले. काळ्या यादीत टाकलेल्या मिल मालकांना पुन्हा माल देण्यासाठी जीआर काढण्यात आले. नोव्हेंबरमध्ये काळ्या यादीत आणि फेब्रुवारीत पुन्हा त्यांनाच मदत करणारा आदेश काढण्यात आला, याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com