Farmer Agricultural News direct supply of agri inputs start Akola Maharashtra | Agrowon

तेल्हारा तालुक्यात कृषी निविष्ठांचा थेट पुरवठा सुरु 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

अकोला  ः कृषी विभागाच्या पुढाकाराने रविवारी (ता.३) तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खतांचा थेट पुरवठा सुरु करण्यात आला. 

अकोला  ः कृषी विभागाच्या पुढाकाराने रविवारी (ता.३) तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खतांचा थेट पुरवठा सुरु करण्यात आला. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांवर येऊन बियाणे व खते खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते. किमान अंतर न पाळल्यास कोरोनाचा फैलाव वाढू शकतो. ही बाब पाहता शेतकऱ्यांना सर्व कृषी निविष्ठा थेट बांधापर्यंत पोचविण्याकरिता तेल्हारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे एक ऑनलाइन लिंक देण्यात आली. त्यावर शेतकऱ्यांची व शेतकरी गटांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाण्यांचा पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

रविवारी तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्रावरून तालुक्यातील मौजे शेरी वडनेर व शेरी बुद्रूक येथे दोन शेतकरी गटांना एकूण ५८ बॅग खतांचा पुरवठा त्यांच्या बांधापर्यंत करण्यात आला. या उपक्रमामुळे शासनाने ठरवून दिलेल्या रास्त दरातच कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास सुद्धा मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी केले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...