वाशीम जिल्हा नियोजन समिती होणार ‘पेपरलेस’

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वाशीम  : लोकाभिमुख, पारदर्शक, गतिमान प्रशासन करण्याच्या दृष्टीने वाशीम जिल्हा नियोजन समितीत कामकाजाची अंमलबजावणी आयपीएएस या वेब बेस प्रणालीद्वारे होणार आहे. येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिल २०२० पासून जिल्ह्यातील यंत्रणांच्या विविध विकासकामांच्या प्रस्तावास मंजुरी, विभागातर्फे होणारा फायलींचा प्रवास, कामांची स्थिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजना, खासदार व आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, पर्यटन विकास कार्यक्रम, अल्पसंख्यांक विकास कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम आदी योजनांना प्रशासकीय मंजुरी, निधी वितरण व संनियंत्रणांची कामे, जिल्हा नियोजन समिती कार्यालयामार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचे संगणकीकरण करून ते पेपरलेस केले जाणार आहेत. जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी, कार्यान्वयीन यंत्रणा इंटरनेटद्वारे अर्थात आयपीएएसद्वारे जोडल्या जातील. जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडून संनियंत्रण करण्यात येणाऱ्या योजनांची अद्ययावत माहिती एकत्रितरीत्या राज्यस्तरावर उपलब्ध होणार आहे. याबाबत घेतलेल्या कार्यशाळेत सेवानिवृत्त उपायुक्त (नियोजन) कि. ना. पाटील यांनी प्रशिक्षण दिले. 

कार्यशाळेस जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com