Farmer Agricultural News disturbance in paddy harvesting due to rain Ratnagiri Maharashtra | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत पावसाचा अडथळा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

रत्नागिरी ः जिल्ह्यात सुमार १५ हजार हेक्टरवर हळवी जातीच्या भाताची लागवड झाली असून त्याच्या कापणीवर पावसाचे सावट आहे.

रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले आहे; मात्र पावसाची उघडीप मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कधी दिवसा तर कधी रात्री पावसाची मोठी सर पडत असल्यामुळे तयार झालेले भात पीक कापण्याचे धाडस शेतकरी करीत नाही. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उभे भात पीक पावसाने आडवी झाले आहे. जिल्ह्यात सुमार १५ हजार हेक्टरवर हळवी जातीच्या भाताची लागवड झाली असून त्याच्या कापणीवर पावसाचे सावट आहे.

रविवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात मंडणगडमध्ये ३.८०, दापोलीमध्ये ९.००, खेडमध्ये ७.३०, गुहागरमध्ये १४.३०, चिपळूणमध्ये ८.२०, संगमेश्‍वरमध्ये १७.७०, रत्नागिरीमध्ये १९.६०, लांजात १३.००, राजापुरात ५.६० मिमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात सरी बरसत आहे.

सुरवातीपासूनच ही परिस्थिती असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात सुमारे २० हजार हेक्टरवर हळव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. त्यातील १५ हजार हेक्टरवरील भात पीक कापणी योग्य झाले आहेत. या परिस्थितीत सतत पाऊस पडत राहिल्यामुळे कापणी रखडली आहे. गेले पंधरा दिवस कधी सकाळी तर कधी रात्री पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहे. दुपारी दोन ते तीन तासांसाठी पाऊस विश्रांती घेतो; मात्र भात कापणीसाठी तेवढा कालावधी पुरेसा नाही.

सलग दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली तर कापलेलं भात सुकवून सुरक्षित ठिकाणी नेणे शक्य होते. पण तशी परिस्थिती नाही. लांजा तालुक्यातील भांबेड येथे सुमारे एक हेक्टरवरील भात पीक आडवे झाल्याने नुकसान झाले आहे. उर्वरित आठ तालुक्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे.

प्रतिक्रिया
पाऊस थांबला नाही तर तयार झालेले भात पीक पडून नुकसान होईल. हळव्या जातीच्या भाताला लोंबी आली आहे. तयार झालेले भात पीक मळ्यातच पडून राहिले तर उगवून येईल.
- संतोष भडवळकर, राजवाडी, संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...