लासलगाव बाजार समितीत खुल्या पद्धतीने कांदा लिलाव करा : जयदत्त होळकर

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त बारदान गोणीतून आलेल्या कांद्याचा लिलाव होत आहे. संचारबंदीच्या काळात शेतकऱ्यांना विनाकारण गोणीच्या खर्चाला सामोरे जावे लागत आहे. लासलगाव वगळता इतर बाजारात खुल्या पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरू असताना लासलगावमधील सुरू असलेला गोणी पद्धतीने कांदा लिलाव तातडीने बंद करून खुल्या पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरू करण्याची मागणी लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती व मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केली आहे.
संग्रहित छायाचित्र

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गेल्या ४० दिवसांपासून शासनाने संचारबंदी लागू केलेली आहे. या कालावधीत शेतीमाल विक्रीला सूट देण्यात आली आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या बारदान गोणीतून कांद्याचे लिलाव केले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. लिलावाकरिता बारदान गोण्या सक्तीच्या करण्यात आल्या असल्या तरी लिलाव झाल्यानंतर कांदा इतर ठिकाणी पाठविण्यासाठी या बारदान गोण्या वापरत नसल्याने शेतकऱ्यांना विनाकारण बारदान गोणीचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

सध्या कांदा ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यातच गोणीचा खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्देशित केलेल्या सुरक्षित अंतर ठेवून योग्य ते उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी लासलगाव बाजार समितीत खुल्या पद्धतीने कांद्याचे लिलाव करण्यात यावे अशी मागणी श्री. होळकर यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com