Farmer Agricultural News Dr N D Patil gives hint for loan waive kolhapur maharashtra | Agrowon

ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू : डॉ. प्रा. एन.डी. पाटील

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 डिसेंबर 2019

कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी रविवारपूर्वी (ता. २२) करावी, अन्यथा या कालावधीनंतर सरकारच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा इशारा ज्‍येष्‍ठ नेते डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला.

ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी यांसह विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात सर्वपक्षीय शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते.

कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी रविवारपूर्वी (ता. २२) करावी, अन्यथा या कालावधीनंतर सरकारच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा इशारा ज्‍येष्‍ठ नेते डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला.

ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी यांसह विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात सर्वपक्षीय शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते.

ते म्हणाले, की महापुराच्या काळात भाजप शिवसेनेच्या युती सरकारने अनेक घोषणा केल्या. मात्र यापैकी अनेक घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. शासन कानाडोळा करीत असेल, तर जनता कधी क्षमा करीत नाही. नव्या सरकारने वेळीच सावध व्हावे. शेतकरी आत्महत्या करीत असताना, केवळ सहानुभूती दाखवण्याचा प्रयोग मागील शासनाला भोवला आहे. 

पूर ओसरून चार महिने झाले तरी, अद्यापही महावितरणकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे नाहीत. ही खेदाची बाब आहे. अधिवेशन असल्यामुळे या सरकारला २२ डिसेंबरपर्यंतची मुदत देत आहोत. या मुदतीत या मेळाव्यातील मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या न्यायहक्‍काकरिता मी पुन्हा रस्त्यावरची लढाई लढणार आहे. याची दखल शासनाने घ्यावी, असा इशारा डॉ. पाटील यांनी या वेळी दिला.

माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, प्रताप होगाडे, अरुण लाड, महादेव धनवडे, बाबासाहेब देवकर, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आदींची या वेळी भाषणें झाली.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...
‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला  ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...
रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...
काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती  ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...
नाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक  : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...
व्हिडिओतील छेडछाड भोवली; प्रभारी सहकार...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले...सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला...
नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून...मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या...
सातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी...सातारा  : चालू आर्थिक वर्षात विविध...
सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे...अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले...
कृषिमंत्री पाठविणार चार हजार सरपंचांना...मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक...
अनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्तमुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
पुरंदर तालुक्यातून डाळिंबाची युरोपात...गुळुंचे, जि. पुणे : कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील...
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा...कोल्हापूर : ‘रयत अ‍ॅग्रो’च्या कडकनाथ कोंबडीपालन...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...