Farmer Agricultural News Dragon fruit plantation area increase Sangli Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात ड्रॅगन फ्रुटचे क्षेत्र वाढले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 जुलै 2020

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळग्रस्त पट्ट्यासह बागायती भागातील शेतकऱ्यांचा ड्रॅगन फ्रुट लागवडीकडे कल वाढला आहे. या फळाबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे.
- बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

सांगली  : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या ड्रॅगन फ्रुट या फळाच्या लागवडीखाली दोन वर्षांपूर्वी ४० एकर क्षेत्र होते. दोन वर्षांत ड्रॅगन फ्रुटची लागवड १०० एकर क्षेत्रावर झाली आहे. यात सर्वाधिक लागवड क्षेत्र जत तालुक्यात आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या दुष्काळामुळे डाळिंब, द्राक्ष बागायतदारांना नेहमीच आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. तेलकट डाग रोगामुळे डाळिंब बागा संकटात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पट्ट्यातील जत तालुक्यात प्रामुख्याने ड्रॅगन फ्रुट लागवडीस प्रारंभ झाला. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या पिकाचा अभ्यास करून लागवड करण्यास पुढाकार घेतला आहे.

जत तालुक्यात सुमारे ५० एकरांवर ड्रॅगन फ्रुटची लागवड आहे. तसेच तासगाव, मिरज या पट्ट्यातदेखील या फळाची लागवड वाढू लागली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी ४० एकरांवर ड्रॅगन फ्रुटची लागवड होती. त्यातून सुमारे ७० टन फळांची विक्री सांगली शहरासह अन्य भागात केली गेली. कमी पाण्यात आणि कमी खर्चामुळे शेतकरी या पिकाकडे वळू लागले आहेत. कृषी विभागदेखील शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट लागवडीबाबत मार्गदर्शन करीत आहे. सध्या जिल्ह्यातील ९० शेतकऱ्यांनी १०० एकरांवर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...