जळगावात केळी वाहतुकीसाठी ई-पास सुविधा

जळगाव ः परराज्यात केळी पाठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यात प्रशासन व शेतकरी यांच्या समन्वयातून कार्यवाही सुरू झाली आहे. त्यासंबंधी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ई-पास उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पासमुळे उत्तर भारतात केळी वाहतुकीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी रावेर, यावल (जि.जळगाव) भागातील केळीशी संबंधित संस्था, शेतकरी यांनी पुढाकार घेतला आहे.
जळगावात केळी वाहतुकीसाठी ई-पास सुविधा
जळगावात केळी वाहतुकीसाठी ई-पास सुविधा

जळगाव  ः परराज्यात केळी पाठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यात प्रशासन व शेतकरी यांच्या समन्वयातून कार्यवाही सुरू झाली आहे. त्यासंबंधी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ई-पास उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पासमुळे उत्तर भारतात केळी वाहतुकीसाठी कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी रावेर, यावल (जि.जळगाव) भागातील केळीशी संबंधित संस्था, शेतकरी यांनी पुढाकार घेतला आहे.

उत्तर भारतात केळी पाठवू इच्छिणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-मेलवर ट्रकची आवश्‍यक ती कागदपत्रे व उत्तर भारतातील व्यापाऱ्यांच्या मागणीचे पत्र पाठविणे बंधनकारक आहे. ही कागदपत्रे सादर केल्यानंतर ई-पास उपलब्ध करून दिला जाणार आहे. चोपडा येथे या पाससाठी अर्ज करण्याकरिता शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातील बाबासाई कॉम्प्युटर महा ई सेवा केंद्र मदत करणार आहेत. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल, असे शेतकरी कृती समितीचे एस.बी.पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी उत्तर भारतातील तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून केळी वाहतुकीस परवानगी देण्याची मागणी केली होती. तिन्ही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. केळीची पाठवणूक सुरू झाली असून, आगामी आठवडाभरात केळीची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होईल, अशी चिन्हे आहेत.

केळी दरांवर दबाव ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुुळे रस्त्यात केळी वाहतूक करणारी वाहने अडवण्याची भीती असल्यामुळे व्यापारी केळी खरेदीचा धोका पत्करण्यास तयार नव्हते; तर याच कारणामुळे काढणी रखडली. अपेक्षित प्रमाणात मजूर मिळत नाहीत. यामुळे केळीचे दर दबावात आहेत. रावेर बाजार समितीने एक हजार रुपये क्विंटल दर जाहीर केला. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून खरेदी पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल या दरात केळी खरेदी केली जात आहे. काही भागांत अजून शेतकऱ्यांकडून खरेदी सुरूच झालेली नसल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com