Farmer Agricultural News election result declared of Malegaon Sugar Factory Pune Maharashtra | Agrowon

माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन; राष्ट्रवादीची बाजी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनेलने बाजी मारली आणि सत्तापरिवर्तन झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने मुसंडी मारत यश खेचून आणले. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, सुरेश खलाटे, तानाजी कोकरे, संगीता कोकरे हे विद्यमान संचालक पुन्हा निवडून आले. विशेषतः पवार यांनी मावळते सत्ताधारी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांना शह देत माळेगावचा गड जिंकला. 

माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनेलने बाजी मारली आणि सत्तापरिवर्तन झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने मुसंडी मारत यश खेचून आणले. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, रंजन तावरे, सुरेश खलाटे, तानाजी कोकरे, संगीता कोकरे हे विद्यमान संचालक पुन्हा निवडून आले. विशेषतः पवार यांनी मावळते सत्ताधारी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांना शह देत माळेगावचा गड जिंकला. 

माळेगावच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.२४) ९ वाजता सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (ता. २५) दुपारी संपली. २१ जागांपैकी १७ जागांवर विजय मिळवित राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनेलने यश संपादन केले, तर ४ जागा जिंकत चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी सहकार बचाव पॅनेलच्या माध्यमातून कडवी झंुज दिली. सांगवी या गटामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने पुन्हा मतमोजणी घेण्यात आली होती. उमेदवार रणजित खलाटे विरुद्ध राष्ट्रवादीचे अनिल तावरे यांच्या मतांमध्ये एक अंकी फरक होता. त्यामुळे तावरे यांच्या मागणीनुसार घेतलेल्या फेर मतमोजणीत त्यांचा २० मतांनी विजय झाला. अर्थात हा अनपेक्षित धक्का सहकार बचाव पॅनेलला मानला जातो. 

दरम्यान, अर्थसंकल्पी अधिवेशनामुळे व्यस्त असतानाही अजित पवार यांनी वेळ देत माळेगावसाठी मोर्चेबांधणी केली होती. नवीन चेहऱ्यांबरोबर बंडखोर माजी संचालकांना बरोबर घेत अजित पवार यांनी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांना सत्तेपासून दूर ठेवले. तसेच कार्यक्षेत्रात चार सभा घेत श्री. पवार यांनी सांगवी गटाच्या बालेकिल्ल्यात चंद्रराव तावरे यांना खिंडार पाडण्यासाठी उद्योजक नितीन जगताप यांच्या माध्यमातून पक्षाची चौथी उमेदवारी दिली होती. जगताप यांनी पक्षाचे प्रामाणिक काम केले, परंतु त्यांना स्वतः निवडून येता आले नाही. 


इतर ताज्या घडामोडी
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...