सोलापूर जिल्हा दूध संघाची अध्यक्ष निवड लांबणीवर

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया सहकारी संघाच्या (दूध पंढरी) अध्यक्ष निवडीसाठी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनीनव्या अध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक बोलविली होती. परंतु, या बैठकीला एकही संचालक उपस्थित न राहिल्याने ही बैठक तहकूब करण्यात आली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया सहकारी संघाच्या (दूध पंढरी) अध्यक्ष निवडीसाठी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांनी शुक्रवारी (ता.२१) दूध संघाच्या कार्यालयात नव्या अध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक बोलविली होती. परंतु, या बैठकीला एकही संचालक उपस्थित न राहिल्याने ही बैठक तहकूब करण्यात आली. त्यामुळे दूध संघाच्या अध्यक्षांची निवड आता आणखी काही दिवस लांबणीवर पडणार आहे.

जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी मार्च महिन्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, नंतर संचालक मंडळानेच तूर्त हा राजीनामा तहकूब ठेवण्याची मागणी केली होती. पण विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांनी एकदा दिलेला राजीनामा अशा पद्धतीने परत घेता येत नाही, असे सांगत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार शुक्रवारी (ता.२१) ही निवडणूक प्रक्रिया होणार होती. त्यासाठी रीतसर सर्व संचालकांनाही पूर्वसूचना दिली. तसेच स्वतः श्री. शिरापूरकर कार्यालयातही आले.

दुपारपर्यंत एकही संचालक इकडे फिरकला नाही. त्यामुळे शेवटी ही बैठक तहकूब करण्यात आली. बैठकीचे इतिवृत्त तयार करून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी शिरापूरकर यांनी दिली.  दरम्यान, आणखी काही दिवस ही निवडणूक लांबणीवर पडली आहे. आमदार संजय शिंदे, माजी आमदार दिलीप माने यांची नावे सध्या चर्चेत आहेत. साधारण पुढील महिन्यात ही प्रक्रिया पार पडेल, असे सांगण्यात आले. आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com