Farmer Agricultural News farmer cuts the grapes orchid nashik maharashtra | Agrowon

...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर चालवली कुऱ्हाड

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष बाग उभी केली. फळधारणा झाल्यानंतर पिकावरील रोग नियंत्रणासाठी लाखो रुपये खर्चून फवारण्या केल्या. मात्र प्रादुर्भाव आटोक्यात न आल्याने हा निर्णय घ्यावा लागला. आता नवीन बाग पुन्हा उभ्या करण्यासाठी १७ ते २० लाख रुपये खर्च लागणार आहे. 
- बाबूराव सानप, द्राक्ष उत्पादक शेतकरी

नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे बाबूराव सानप यांची २५ एकर शेती आहे. १८ एकरांवर द्राक्ष बाग, तर उर्वरित क्षेत्रावर उसाचे पीक आहे. मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, लाखो रुपयांचा केलेला खर्च, व्यापाऱ्यांकडून झालेली फसवणूक, रोगांच्या प्रादुर्भावामुळे बाधित झालेली द्राक्ष बाग अशी संकटांची मालिका सुरूच आहे. या समस्यांना कंटाळून अखेर  सहा एकरांवरील द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालविण्याची दुर्दैवी वेळ द्राक्ष उत्पादक बाबूराव सानप यांच्यावर आली आहे. 

मागील काही वर्षांत प्रामुख्याने २०१३, २०१४ मध्ये सलग दोन वर्षे गारपीट झाल्याने हातातोंडाशी आलेले द्राक्ष पीक वाया गेले. पुढे यातून ते सावरले. भांडवल उभे केले अन् गुणवत्तापूर्ण द्राक्ष पिकवले. विक्रीही झाली मात्र व्यापाऱ्याने २०१५ मध्ये ११ लाखांची फसवणूक केली.

मोठ्या आर्थिक तणावात हातात भांडवल नसताना पुन्हा शेती उभी करण्यासाठी ३० लाखांचे पीककर्ज घेऊन शेती उभी केली. पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना द्राक्ष बागा जिवंत ठेवल्या मात्र अतिवृष्टीच्या तडाख्यात बागा बुरशीजन्य रोगाच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. अखेर नाइलाजाने बाग तोडण्याची नामुष्की श्री. सानप यांच्यावर आली आहे.

सहा वर्षांपूर्वी ६ एकर क्षेत्रावर सानप यांनी द्राक्ष लागवड केली होती. चालू वर्षी या क्षेत्रावर १२ सप्टेंबरच्या दरम्यान गोडी छाटणी घेतली. वेलींना चांगल्या प्रमाणावर घडधारणा झाली होती. मात्र नोव्हेंबरच्या सुरुवातीस झालेल्या पावसाच्या तडाख्यात बाग सापडल्याने मोठ्या प्रमाणावर घडकूज झाली. प्रतिकूल हवामानामुळे डाउनीचा मोठा प्रादुर्भाव द्राक्ष पिकावर झाला. सप्टेबर ते नोव्हेंबर या ३ महिन्यांच्या कालावधीत मजुरी, खते व कीटकनाशकांसाठी ९ लाख रुपये खर्च झाले. मात्र खर्च व मेहनत घेऊनही उत्पादन निघणार नसल्याने त्यांनी  बागेवर कुऱ्हाड चालविली. 
 


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...