Farmer Agricultural News farmer damage cabbage crop by rotavetar Nagar Maharashtra | Agrowon

मागणी, दराअभावी कळस खुर्द येथील शेतकऱ्याने कोबीवर फिरवला रोटाव्हेटर

सुर्यकांत नेटके
बुधवार, 8 एप्रिल 2020

भाजीपाला बाजारात विक्रीसाठी नेता येत असला तरी दर नाही. शिवाय वाहन धारकही येत नाहीत. त्यामुळे काढणीपासून वाहतुकीपर्यंत खर्च केला तरी तो विक्रीतून निघेल याची शक्यता नाही. त्यामुळे दोन एकर कोबीवर रोटाव्हेटर फिरवण्याशिवाय पर्यायच उरला नाही. 
- रवींद्र झोगडे, शेतकरी, कळस खुर्द, ता. अकोले, जि. नगर.

नगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे संचारबंदी आहे. कृषी विभागाने बाजारात भाजीपाला नेण्याची व्यवस्था केली. पण बाजारात मागणी नाही आणि दरही नाही. एकतर वाहनचालकच शहरात जायला धजावत नाहीत. आलेच तर विक्री केलेल्या मालातून भाडेपट्टीही निघणार नाही. त्यामुळे कोबीत रोटाव्हेटर मारण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता, अशी व्यथा अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथील रवींद्र झोगडे हे शेतकरी पोटतिडकीने मांडत होते. 

‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून लॉकडाउन आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीची अडचण निर्माण झाली आहे. वाहतूक बंद असली तरी कृषी विभागाने भाजीपाला, फळे विक्रीसाठी परवाने देऊन वाहतूक सुरु ठेवली आहे. मात्र हॉटेल्स, मॉल बंद आहेत. घाऊक व्यापारीही खरेदी करत नसल्याने शेतीमालाचे लिलाव बंद आहेत. याशिवाय वाहनधारकही वाहने शहरात न्यायला धजावत नसल्याने परराज्यात भाजीपाला जात नाही, निर्यातही बंद आहे. या साऱ्या बाबींचा भाजीपाला दरावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 

अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथील रवींद्र झोगडे हे शेतकरी अनेक वर्षांपासून कोबीचे उत्पादन घेतात आणि मुंबईच्या बाजारात विक्री करतात. सध्या त्यांच्याकडे दोन एकरांवर कोबी होता. विक्री करायची वेळ आली आणि कोरोनामुळे देश, राज्यात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे कोबी बाजारात विक्रीसाठी नेण्याची अडचण झाली. कृषी विभागाने, प्रशासनाने भाजीपाला विक्रीसाठी परवाने दिले खरे, मात्र बाजारात मागणी नसल्याने नेहमीच्या तुलनेत निम्मेही दर मिळत नाहीत. शिवाय नेहमीचे खरेदीदार थेट पैसे पाठवायचे, आता नव्याने खरेदीदार आले आहेत.

पाच-सहा दिवसांपासून वाहन शोधत होतो. मात्र वाहनधारकही शहरात जायला धजावत नाहीत. त्यामुळे आता कोबीवर रोटावेटर फिरवण्याशिवाय पर्यायच उरला नाही. या कोबीसाठी सव्वा लाख रुपये खर्च केले आहेत. अजून दुकानदारांची उधारी द्यायची आहे. मात्र कोबीतून यंदा अडीच लाखांचा फटका बसलाय. आता कोबी विक्रीच्या वायद्यावर बोली असलेली उधारी कशी मिटवायची असा प्रश्न आहे असे त्यांनी  सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...