वाकी येथील शेतकरी जाधव यांनी ३ एकरांवरील बोर बागेवर ट्रॅक्टर फिरवला.
वाकी येथील शेतकरी जाधव यांनी ३ एकरांवरील बोर बागेवर ट्रॅक्टर फिरवला.

तीन एकरांवरील बोर बागेवर फिरवला ट्रॅक्टर

डाळिंब आणि बोरांच्या शेतीतून झालेले नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे आता आमच्या कुटुंबाच्या आशा ऊस पिकावर आहेत. - सुनील जाधव, शेतकरी, वाकी-सांगोला

सोलापूर  : डाळिंब-बोराची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुक्यातील शेतकरी यंदा अवकाळी पावसाने आणि कोसळलेल्या भावामुळे आर्थिक अडचणीत सापडलेत. या कारणानेच वाकी येथील शेतकरी जाधव यांनी ३ एकरांवरील बोर बागेवर ट्रॅक्टर फिरवला.

वाकी येथील अनिल, सुनील, कुमार जाधव या भावंडांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. सुनील जाधव म्हणाले, की साडेआठ एकरांतील डाळिंब बागेत पावसामुळे सेटिंग झाले नाही. पण गेल्या वर्षी इतर शेतकऱ्यांनी बोर बागा तोडल्याने आमच्या बोरांना चार पैसे मिळतील असे वाटत होते. पण रुपया किलोने ही बोरे कोणी घ्यायला तयार नाहीत. व्यापाऱ्याला बोलावून बोरे विकत घ्यायला सांगितले. त्यावर बोरे तोडून ५ रुपये किलो भावाने विकत घेतो, असे व्यापारी म्हणाला. प्रत्यक्षात १ टन बोरे तोडण्यासाठी १० जणांना द्यावा लागणारा रोजगार पाहता, खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे बाग तोडण्याचा निर्णय घेतला.

जाधव यांच्या बागेत तोड नसल्याने बोरे गळून पडून वास यायला लागला होता. मुळातच ३ वर्षांपूर्वीच्या बागेवर जाधव यांनी आत्तापर्यंत साडेसहा लाखांपर्यंत खर्च केला. गेल्या वर्षी पहिले ५० टन उत्पादन मिळाले होते. ही बोरे व्यापाऱ्यांना तसेच नागपूर बाजारपेठेतही विकली होती. त्यातील १ लाखांचा खर्च वजा जाता, २ लाख मिळाले होते. उर्वरित खर्च यंदा निघण्याची त्यांना अपेक्षा होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com