Farmer Agricultural News farmer direct sold vegetables Nagar Maharashtra | Agrowon

निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

आठवडी बाजार, भाजीपाला विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांनी ताजा भाजीपाला नेहमीच्या दरात थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला. व्यापारी विकतात त्या दरात भाजीपाल्याची विक्री केली असती तर दुप्पट पैसे मिळाले असते. आम्ही ग्राहकांचे हित जोपासण्याला कायम प्राधान्य देत असतो. थेट ग्राहकाला रास्त दरात भाजीपाला विकत असल्याचे समाधान मिळते.
- नाना प्रभू वराळ, शेतकरी, संपर्क ः ९६२३२६५९९८.

नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार बंद झाल्यानंतर घरी येऊन व्यापाऱ्यांनी १५ रुपये किलोने खरेदी केलेले बटाटे गावांत नेऊन ४० रुपये किलोने विकायचे. ही बाब लक्षात येताच निघोज (ता. पारनेर) येथील नाना प्रभू वराळ या शेतकऱ्यांने व्यापाऱ्याऐवजी स्वतःच वाहनातून गाव, वाडी वस्तीवर भाजीपाला विक्री केली. सात दिवसांत ३५ हजार रुपयांचा भाजीपाला थेट ग्राहकांना विकला आणि ग्राहकांचा फायदा पाहताना नफाही मिळवला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून लाॅकडाऊन केले आहे. त्यामुळे बाजार समितीत भाजीपाला विक्री बंद असून वाहने बंद असल्याने वाहतूकही करता येत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. भाजीपाल्याचे नुकसान होत आहे. गरजेनुसार व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतीमाल खरेदी करत असताना दर मात्र पडले आहेत. निघोज येथील नाना प्रभू वराळ यांची सात एकर शेती आहे. त्यात त्यांनी गवार, दुधी भोपळा, डांगर भोपळा, बटाटे, बीट, कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक ही पिके घेतली आहे.

लॉकडाऊन झाल्याने भाजीपाल्याची विक्री कशी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. व्यापाऱ्यांनी शेतात पंधरा रुपये किलोने खरेदी केलेले बटाटे गावांत नेऊन चाळीस रुपये किलोने विकले. हाच धागा पकडून वराळ यांनी स्वतः वाहनातून उत्पादित केलेला भाजीपाला निघोजसह परिसरातील गाव, खेड्यात, वस्तीवर जाऊन ग्राहकांना विक्री केला. त्यांनी बटाट्याची वीस रुपये किलो, कोंथिंबीरीची जुडी दहा रुपये, कांदयाची पंधरा रुपये किलो, बीटाची दहा रुपये किलो दराने विक्री केली. त्यातून त्यांनी आठ दिवसात दिड टन बटाट्यासह इतर भाजीपाला विक्रीतून ३५ ते ४० हजार रुपये मिळाले. भाजीपाला विक्री थेट ग्राहकांनाच सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 


इतर ताज्या घडामोडी
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या...पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते...
माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः...अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच...
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...