Farmer Agricultural News farmer free circulate wheat to needy peoples Nashik Maharashtra | Agrowon

गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली गव्हाची रास...!!!

मुकुंद पिंगळे
रविवार, 29 मार्च 2020

नाशिक : सध्याच्या आणीबाणीच्या काळात हातावर प्रपंच असणाऱ्या घटकाला धान्याची मदत करून जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता.निफाड) येथील प्रविण रामराव पाटील यांनी  माणूसकी दाखवत या कुटुंबांना मोठा आधार दिला आहे.  

नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर प्रपंच असणाऱ्या घटकाला धान्याची मदत करून जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता.निफाड) येथील प्रविण रामराव पाटील यांनी  माणूसकी दाखवत या कुटुंबांना मोठा आधार दिला आहे.  

प्रविण पाटील हे तरुण शेतकरी असून चालू वर्षी त्यांनी तीन एकर क्षेत्रावर गहू पेरला होता. त्यापैकी एक एकर गव्हाची सोंगणी करून मळणी झाली. हा गहू शेतात रास करून ठेवलेला होता. याच दरम्यान लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हातावर प्रपंच असलेली एक महिला सकाळीच घरी आली अन म्हणू लागली, "काही शीळं पाकं उरलेलं अन्न असेल तर द्या, आता आमचं हातचं काम गेलयं, आता कुणाकडे पैसा नाही, काही उरलं तर देत जा." या महिलेची विनवणी पाहून प्रविण पाटील यांनी मानवतेच्या भावनेने मदतीसाठी हात पुढे केला.

‘‘आता तुम्ही शीळं पाकं नाही तर, तर ताजं अन्न खा, माझ्याकडचा गहू घेऊन जा, आणि इतर गरजूंना पण सांगा’’, असे सांगत गरजेपुरता गहू दिला. गावातील मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालविणारे मजूर कामाविना बसून आहे. काही कुटुंबांकडे तर अन्नधान्याचा तुटवडा असल्याची बाब लक्षात आल्यानंतर प्रविण पाटील यांनी कोणताही विचार न करता काढलेली २० क्विंटल इतकी असलेली गव्हाची रास सामाजिक भावनेतून खुली करून दिली.

गावातील गरजू लोकांची गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे यासाठी शेताकडे येणाऱ्या रस्त्यावर ठराविक अंतरावर पांढरे चौकोन आखून गहू वाटप करताना अंतर ठेवण्याचे आवाहन केले. त्यांचे वडील रामराव बाळाजी पाटील, आई तसेच त्यांच्या पत्नी यांनी या निर्णयाचे स्वागत केले . 


इतर ताज्या घडामोडी
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या...पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते...
माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः...अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच...
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...