Farmer Agricultural News farmer gives fund for corona patients Kolhapur Maharashtra | Agrowon

पूरग्रस्त शेतकऱ्याने मिळालेली मदत कोरोनाग्रस्तांसाठी केली शासनास परत

राजकुमार चौगुले
गुरुवार, 30 एप्रिल 2020

कोल्हापूर : महापुरात घर व शेतीचे नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईपोटी मिळालेली ९५ हजार रुपयांची रक्कम औरवाड (ता.शिरोळ) येथील बाळासाहेब रावण या शेतकऱ्याने ‘कोरोना’ रोखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या शासनाला देण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम त्यांनी मंगळवारी (ता.२८) मुख्यमंत्री सहायता निधीस वर्ग केली आहे.

कोल्हापूर : महापुरात घर व शेतीचे नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईपोटी मिळालेली ९५ हजार रुपयांची रक्कम औरवाड (ता.शिरोळ) येथील बाळासाहेब रावण या शेतकऱ्याने ‘कोरोना’ रोखण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या शासनाला देण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम त्यांनी मंगळवारी (ता.२८) मुख्यमंत्री सहायता निधीस वर्ग केली आहे.

‘कोराना’ला रोखण्यासाठी शासन अहोरात्र धडपडत करीत आहे. यासाठी अनेकांकडून देणग्याही येत आहेत. दक्षिण महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात अनेकांची घरे, शेत याचे मोठे नुकसान झाले. याची नुकसानभरपाई शासनाने नुकतीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. श्री. रावण यांच्या खात्यावरही ही रक्कम जमा झाली होती. रावण कुटुंबाने नुकसानभरपाईची वाट न पाहता रक्कम मिळण्याअगोदरच स्वखर्चाने घराची डागडुजी करून घेतली आहे.

महापूर असताना शासनासह अन्य संस्थांनी केलेल्या मदतीमुळे रावण कुटुंबाला मोठा आधार मिळाला. आता इतर लोक अडचणीत असताना ही मदत घेणे त्यांना उचित वाटले नाही. त्यांची तीन एकर शेती आहे. तसेच एक मुलगा अभियंता आहे तर दुसरा मुलगा शेती करतो. आता रक्कमेची खरी गरज इतरांना असल्याची त्यांची भावना होती. मुलगा संदीप, प्रदीप तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रभावती रावण यांच्याशी चर्चा करून त्यांनी कोणताही गाजावाजा न करता ९५,१०० रुपयांची रक्कम ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोव्हीड- १९’ या खात्यात मंगळवारी (ता.२८) वर्ग केली. शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी त्यांना याबाबतचे मार्गदर्शन केले.

महापुराने सर्वकाही उध्वस्त झाले होते. जेव्हा आम्ही अडचणीत होतो, तेव्हा शासन व काही सेवाभावी संस्थांनी अतिशय जलद हालचाल करून आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही आमचा संसार उभा करू शकलो. त्यावेळी आम्हाला शासनाने धान्य, पैसे जे काही मदत म्हणून देत येईल ते दिले होते. त्या आधारे व अन्य ठिकाणाहून रक्कमेची जुळणी करून आमच्या घराची डागडुजी केली. महापुराच्या भयानक अनुभवातून आम्ही आता सावरत आहोत. पण राज्याला सध्या मदतीची गरज आहे. केवळ यामुळेच आम्ही मिळालेली ही रक्कम शासनाला परत देण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही परिस्थितीस शासनाने ‘कोरोना’ला हरवावे अशी आमची अपेक्षा असल्याचे श्री. रावण यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...