Farmer Agricultural News farmers accident insurance policy scheme status satara maharashtra | Agrowon

दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८० शेतकरी कुटुंबांना विमाकवच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतंर्गत गेल्या दहा वर्षांत एक हजार ३८० मदतीचे प्रस्ताव मंजूर झाले. २२९ प्रस्ताव नामंजूर झाले असले, तरी त्यातील ३१ प्रस्ताव मंजुरीस पात्र आहेत. त्यातील १४ प्रस्ताव न्यायालयीन प्रक्रियेत आहेत, अशी माहिती कृषी अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतंर्गत गेल्या दहा वर्षांत एक हजार ३८० मदतीचे प्रस्ताव मंजूर झाले. २२९ प्रस्ताव नामंजूर झाले असले, तरी त्यातील ३१ प्रस्ताव मंजुरीस पात्र आहेत. त्यातील १४ प्रस्ताव न्यायालयीन प्रक्रियेत आहेत, अशी माहिती कृषी अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

शेती करताना विविध प्रकारचे अपघात होण्याची शक्‍यता असते. वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तींमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. शिवाय नैसर्गिक आपत्तीसह रस्त्यांवरील अपघातांमुळेही मृत्यू ओढावतो. अशावेळी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व ओढवल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणी निर्माण होतात. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ मिळावा म्हणून राज्य शासनाने शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास योजनेच्या निकषानुसार शासनाने नियुक्त केलेली विमा कंपनी दोन लाख रुपये व अपंगत्व आल्यास एक ते दोन लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास नुकसानभरपाई देते. 

शेतकऱ्याचे कुटुंब विमा निकषांमध्ये येत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळत नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविली आहे. सातबारा उताऱ्यावर नाव असलेल्या शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील वहितीधारक म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यालादेखील आता या योजनेचा लाभ लाभ मिळणार आहे. संबंधित शेतकऱ्याचे आई-वडील, पती अथवा पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणत्याही एका व्यक्तीचा समावेश योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यासह कुटुंबातील एक सदस्य अशा दोघांना या योजनेतून विमाकवच मिळणार आहे. 

अशी आहे स्थिती
जिल्ह्यातून या योजनेच्या लाभासाठी २००८-०९ ते २०१८-१९ या कालावधीत एक हजार ६१८ प्रस्ताव दाखल झाले आहेत. ते प्रस्ताव संबंधित विमा कंपनीस सादर केले असून, त्यातील एक हजार ३८० प्रस्ताव मंजूर झाले आहेत. २२९ प्रस्ताव नामंजूर झाले असले, तरी त्यातील ३१ प्रस्ताव मंजुरीस पात्र आहेत. त्यातील १४ प्रस्ताव न्यायालयीन प्रक्रियेत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...