Farmer Agricultural News farmers agitation for demand to start paddy procurement center bhandara maharashtra | Agrowon

धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले सालेभाटा येथील धान केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी श्री छत्रपती शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी (ता. २०) रास्तारोको आंदोलन केले. 

भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले सालेभाटा येथील धान केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी श्री छत्रपती शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी (ता. २०) रास्तारोको आंदोलन केले. 

लाखनी तालुक्‍यातील सालेभाटा येथे असलेले धान खरेदी केंद्र गत दोन महिन्यांपासून बंद आहे. हे केंद्र त्वरित सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. प्रशासनाकडून मात्र त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. अखेरीस संयम सुटलेल्या शेतकऱ्यांनी सालेभाटा येथील बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन केले. रस्ता रोखून धरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास नायब तहसीलदार दोनोडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. परंतु त्यातून काहीच तोडगा न निघाल्याने दुपारी चार वाजल्यापासून आंदोलक राज्य महामार्गावर पोचले.

या वेळी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली. आंदोलन उग्र होत असल्यामुळे पोलिसांची कुमक बोलावण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी बन्सोड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र यावेळी देखील कुठलाही तोडगा निघाला नाही. अखेरीस तहसीलदार मल्लिक विराणी यांनी आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती घनश्‍याम खेडीकर यांनी खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. बारदान्या अभावी खरेदी बंद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा पणन अधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ पाच हजार बारदाना मागविण्यात आला. यात सुरुवातीला अडीच हजार बारदान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्र सुरु होणार असल्याची खात्री पटल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. लाखनी तालुक्‍यातील सालेभाटा केंद्रा अंतर्गंत दोन काटे बसविणे तर राजेगाव व गोंडसावरी येथे खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. 

आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले, सुरेश बोपचे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर रहांगडाले, सुधाकर हटवार, भाष्कर जांभूळकर, दिगांबर जांभूळकर, मंगेश वाघमारे, हेमराज पटले यांनी केले.
 


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...