Farmer Agricultural News farmers angry about agriculture department report Sangli Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान कोटींचे;पंचनामे केवळ २२० हेक्टरचे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस, आटपाडी, वाळवा आणि तासगाव तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने २२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तयार केला आहे.

सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस, आटपाडी, वाळवा आणि तासगाव तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने २२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तयार केला आहे. वास्तविक कोट्यावधींचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पाऊस झाला. आटपाडी, खानापूर, तासगाव आणि मिरज या चार तालुक्यांत चार वेळा अतिवृष्टी झाली आहे. आटपाडी तालुक्यात तर चार दिवसांत वर्षभराचा पाऊस झाला आहे. दुष्काळग्रस्त पट्ट्यातील सर्व तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. हा पाऊस पीक काढणीच्या वेळी झाला. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, समडोळी, कर्नाळ, नांद्रे तसेच वाळवा तालुक्यात सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला पिकांत पाणी साचून आहे.

पलूस, तासगाव आणि आटपाडी तालुक्यातील ज्वारी, भाजीपाला आणि बाजरी पिके अतिवृष्टीमुळे कुजण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने छाटणीही खोळंबली आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे २२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. त्यानुसार पंचनामे केले जाण्याची शक्यता आहे. आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे फक्त १०० हेक्टर नुकसान झाले असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

परंतु, तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. डाळिंबाच्या बागांमध्ये पाच ते सहा दिवस पाणी साचून राहिले होते. त्यामुळे फळकूज होण्यास सुरवात झाली आहे. नदी आणि ओढ्याकाठी असलेल्या बागा पाण्याचा प्रवाहाने उन्मळून पडल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालाबाबत साशंकता उपस्थित होऊ लागली आहे.

शेतकऱ्यांनी सुरु केल्या तक्रारी
अतिपावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशात केवळ २२० हेक्टरवरील पिके कशी बाधित झाली,  असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मुळात पावसाने बाधित झालेले क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी करण्यास सुरवात केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...