Farmer Agricultural News Farmers are allowed to sell cotton only on certain conditions wardha Maharashtra | Agrowon

अटींवरच शेतकऱ्यांना वर्ध्यात कापूस विक्रीची परवानगी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

वर्धा  ः वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या शेतकऱ्यांना संचारबंदीमुळे कापूस विक्रीत अडचण येत आहे. ही बाब लक्षात घेत इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आठवड्यातील एक दिवस वर्धा जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी काढले आहेत. 

वर्धा  ः वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या शेतकऱ्यांना संचारबंदीमुळे कापूस विक्रीत अडचण येत आहे. ही बाब लक्षात घेत इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आठवड्यातील एक दिवस वर्धा जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी काढले आहेत. 

वर्धा जिल्ह्याच्या हद्दीला लागून असलेल्या शेजारील जिल्ह्यातील काही गावांची कापूस विक्रीकरिता वर्धा ही पारंपारिक बाजारपेठ आहे. परंतु ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी आणण्यास अडचण होत होती. या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्ध्यात प्रवेश देण्याची गरज होती. त्यानुसार अटी व शर्तींच्या अधीन राहत या शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांतील कापसाचे वाहन जिनिंगमध्ये आल्यानंतर वाहनासोबत असलेली व्यक्‍ती स्थानिकांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. जिनींगच्या आवारात वाहन आल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण करावे, खरेदी केंद्रावर नमूद व्यवस्था असल्याची खातरजमा केल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यातील कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक परवानगी देतील. स्थानिक मजुरांच्या साहाय्याने कापूस उतरविण्याची व्यवस्था करावी. 

कोणत्याही परिस्थितीत बाहेरील जिल्ह्यातून आलेला मजूर हे काम करणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या दिवशी बाहेर जिल्ह्यातील वाहनाने कापूस संबंधित सुत गिरणीमध्ये येणार असेल त्या दिवशी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण व निरीक्षण करण्यासाठी उपस्थित राहतील. बाहेर जिल्ह्यातील कापूस खरेदीकरिता निश्चि‍त केलेल्या दिवशी अशा जिनींगच्या परिसरात वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. कापूस वाहतुकीकरिता येणारे वाहन कोणत्याही परिस्थितीत चार तासांच्या आत वर्धा जिल्ह्यातून बाहेर जाईल याची दक्षता घ्यावी. 
जिनींग व्यवस्थापनाने प्रवेशव्दाराजवळ हॅण्डवॉश सेंटरची उभारणी करावी. अशा अटींचा भंग केल्यास संबंधितांविरोधात कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...