अकोल्यातील २५ हजार शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीसाठी प्रमाणीकरण शिल्लक

अकोला : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी १ लाख ११ हजार ७९ शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. यापैकी २५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबितआहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी १ लाख ११ हजार ७९ शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. यापैकी २५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे.

शासनाच्या या कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील एक लाख ११ हजार ७९ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत. यापैकी ८५ हजार ५१० शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. प्रसिद्ध याद्यांनुसार ७१ हजार ५९५ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचे बुधवारपर्यंत प्रमाणीकरण करण्यात आले आहे. शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या याद्यांपैकी जिल्ह्यातील २५ हजार ५६९ शेतकऱ्यांच्या प्रमाणीकरण अद्यापही प्रलंबित आहेत.

शासनाच्या या कर्जमाफी योजनेत विविध स्तरावर कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी स्वतः सहमती देणे गरजेचे आहे. सीएससी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांना आपल्याकडे असलेल्या कर्जाच्या रकमेची खातरजमा करावी लागते. रक्कम मान्य असेल किंवा नसेल त्याबाबत सहमती दिल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडली जाते. गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता थंडावत चालली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com