नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
शिरुरमधील साडेसहा हजारांवर शेतकरी भरपाईपासून वंचित
पुणे ः यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये शिरूर तालुक्यात पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे बारा हजार ८६० शेतकऱ्यांना याचा फटका बसला. तालुक्यातील १०४ गावांपैकी ९५ गावांतील पीक नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून शासनाला नुकसानीची आकडेवारी पाठविली. त्यानंतर शासनाकडून ५६ गावांतील शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. तालुक्यात अजूनही दोन कोटी ९४ लाख रुपयांच्या भरपाईपासून ६७०० शेतकरी वंचित असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा शिरूर तालुक्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. त्याखालोखाल तरकारी पिकांना देखील मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिके पाण्याखाली गेली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. महसूल आणि कृषी विभागाने तालुक्यातील १०४ गावांपैकी ९५ गावांतील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले होते.
पंचनामे केलेल्या गावांतील सुमारे १२ हजार ८६० शेतकऱ्यांच्या सहा १२७ हेक्टर क्षेत्रातील शेतीमालाचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतीमाल आणि बाधित क्षेत्रासाठी कृषी विभागाने महसूल प्रशासनाकडे तब्बल चार कोटी ९७ लाख ७० हजार ८९६ रुपयांची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात महसूल प्रशासनाने पंचनामे केलेल्या ९५ गावांपैकी ५६ गावांतील ६ हजार ११४ शेतकऱ्यांच्या खात्यात दोन कोटी तीन लाख २७ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित ६७०० शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. त्यासाठी निधीची तरतूद शासन कधी करणार आणि रक्कम खात्यात कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
- 1 of 1024
- ››