farmer agricultural news farmers deprived from compensation pune maharashtra | Agrowon

शिरुरमधील साडेसहा हजारांवर शेतकरी भरपाईपासून वंचित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

पुणे  ः यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये शिरूर तालुक्यात पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे बारा हजार ८६० शेतकऱ्यांना याचा फटका बसला. तालुक्यातील १०४ गावांपैकी ९५ गावांतील पीक नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून शासनाला नुकसानीची आकडेवारी पाठविली. त्यानंतर शासनाकडून ५६ गावांतील शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. तालुक्यात अजूनही दोन कोटी ९४ लाख रुपयांच्या भरपाईपासून ६७०० शेतकरी वंचित असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

पुणे  ः यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये शिरूर तालुक्यात पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे बारा हजार ८६० शेतकऱ्यांना याचा फटका बसला. तालुक्यातील १०४ गावांपैकी ९५ गावांतील पीक नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून शासनाला नुकसानीची आकडेवारी पाठविली. त्यानंतर शासनाकडून ५६ गावांतील शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. तालुक्यात अजूनही दोन कोटी ९४ लाख रुपयांच्या भरपाईपासून ६७०० शेतकरी वंचित असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

यंदा शिरूर तालुक्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. त्याखालोखाल तरकारी पिकांना देखील मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिके पाण्याखाली गेली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. महसूल आणि कृषी विभागाने तालुक्यातील १०४ गावांपैकी ९५ गावांतील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले होते.

पंचनामे केलेल्या गावांतील सुमारे १२ हजार ८६० शेतकऱ्यांच्या सहा १२७ हेक्टर क्षेत्रातील शेतीमालाचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतीमाल आणि बाधित क्षेत्रासाठी कृषी विभागाने महसूल प्रशासनाकडे तब्बल चार कोटी ९७ लाख ७० हजार ८९६ रुपयांची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात महसूल प्रशासनाने पंचनामे केलेल्या ९५ गावांपैकी ५६ गावांतील ६ हजार ११४ शेतकऱ्यांच्या खात्यात दोन कोटी तीन लाख २७ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित ६७०० शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. त्यासाठी निधीची तरतूद शासन कधी करणार आणि रक्कम खात्यात कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.   


इतर बातम्या
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
खानदेशातून थंडी गायबजळगाव ः खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
परभणी जिल्ह्यात रब्बीत २४.०६ टक्के...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...