Farmer Agricultural News farmers facing trouble for getting crop loan Pune Maharashtra | Agrowon

पीक कर्जासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर हेलपाटे मारण्याची वेळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जून 2020

थकीत कर्जधारकांना सरकारने पीक कर्ज देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यासंदर्भात परिपत्रक आले नसल्याने बॅंका कर्ज देण्यास हलगर्जीपणा करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार बॅंकांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.
- घनश्याम तोडकर, शेतकरी, तळेगाव ढमढेरे, जि. पुणे.

पुणे  ः कर्जमाफीच्या गोंधळामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी थकीत पीक कर्जाची रक्कम भरलेली नाहीत अशा शेतकऱ्यांना तातडीने खरिपासाठी पीककर्ज देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. या सूचनांकडे अनेक राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंका दुर्लक्ष करीत असून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे थकीत पीक कर्जधारक शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी बॅकांकडे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.  

खरीप हंगाम तोंडावर आला असून अनेक शेतकऱ्यांना काही कारणांनी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना आधार देण्याची गरज आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना पीककर्ज वाटपाकडे जिल्ह्यातील काही राष्ट्रीयीकृत व खाजगी बॅंकांनी दुर्लक्ष केले आहे. यास्थितीत शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंकेचा आधार घेतला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज दिल्याचे जिल्हा अग्रणी बॅंकेकडील अहवालावरून स्पष्ट होते. 

सध्या जिल्ह्यात ३१ मार्च अखेरपर्यत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमित परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना सहकारी व खाजगी बॅंकांकडून प्राधान्याने कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी परतफेड केली नाही, अशा शेतकऱ्यांनीही कर्ज पुरवठा करण्यात यावा यासाठी सरकारने आदेश दिले आहेत. तरीही बॅंका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचे समोर आले आहे.  

पुणे जिल्हा अग्रणी बॅंकेने जिल्ह्यातील सर्व बॅंकांना खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा अग्रणी बॅंकेने खरिपासाठी दोन हजार ६३ कोटींचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी २८ मेअखेरपर्यंत एक लाख सहा हजार ४७४ शेतकऱ्यांना ९२५ कोटी ७७ लाख म्हणजेच ४१ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत आणि खाजगी बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यात हात आखडता घेतला आहे.

मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांनी थकीत कर्जधारकांना पीककर्ज देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, बॅंका त्यास प्रतिसाद देत नसून शेतकऱ्यांना पीककर्ज वितरीत करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत येत आहे, असे सणसर येथील शेतकरी पांडुरंग रायते यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...