Farmer Agricultural News farmers facing trouble solapur Maharashtra | Agrowon

सोलापुरातील शेतकऱ्यांची अडवणूक कायम

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 एप्रिल 2020

सोलापूर   ः ‘कोरोना’मुळे शहरातील २१ ठिकाणी महापालिकेने भाजीपाला विक्रीसाठी ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांची सोय केली. पण शहरात विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक अद्यापही संपलेली नाही. शेतीमाल वाहतुकीला अद्यापही पोलिस असहमती दर्शवत असल्याने आणि ठराविक ठिकाणीच बसण्याचा आग्रह करत असल्याने या सगळ्यात शेतकरी मात्र वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

सोलापूर   ः ‘कोरोना’मुळे शहरातील २१ ठिकाणी महापालिकेने भाजीपाला विक्रीसाठी ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांची सोय केली. पण शहरात विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक अद्यापही संपलेली नाही. शेतीमाल वाहतुकीला अद्यापही पोलिस असहमती दर्शवत असल्याने आणि ठराविक ठिकाणीच बसण्याचा आग्रह करत असल्याने या सगळ्यात शेतकरी मात्र वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

गेल्या पंधरवड्यापासून भाजीपाला आणि फळांचे लिलाव बंद आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे कारण देत अद्यापही जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, बाजार समितीतील लिलावासाठी परवानगी देत नाहीत. त्याऐवजी शहरातील २१ ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजीपाला आणून विकावा अशी सोय केली आहे. पण ज्या-त्या भागातील शेतकऱ्यांना त्या-त्या भागातील विक्रेत्यांना भाजी विकावी आणि तिथेच बसावे, अशी अट घातली आहे. त्यामुळे ही अट गैरसोयीची होते आहे. त्यातच आजही शहराच्या सगळ्या नाक्यावर पोलिस बंदोबस्त आहे.

या ठिकाणी अनेकवेळा पोलिस शेतकऱ्यांची अडवणूक करतच आहेत. शेतीमाल अत्यावश्यक सेवेत असतानाही विनाकारण चौकशी करुन त्रास देण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. त्यामुळे शहरात महापालिकेने भाजीविक्रीसाठी सोय केली असली, तरी शेतकऱ्यांना त्यात कितपत स्थान मिळणार आणि किती शेतकरी तिथे जाऊन भाजी विक्री करणार हा प्रश्नच आहे. या सगळ्यामध्ये महसूल, महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यात गोंधळ असल्याचे चित्र आहे.
 
शेतकऱ्यांना पासची अडचण कायम
सोलापूर शहरानजीकच्या उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि अक्कलकोट तालुक्यात गेल्या सहा दिवसांत संपूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे या कालावधीत ठराविक वेळ असल्याने तुलनेने कमी भाजीपाला शहराला पुरवठा झाला. शिवाय पासशिवाय शहरात जाता येत नसल्याने अनेकांनी तो जाग्यावरच सोडला. आता संचारबंदी उठल्याने पुन्हा शहराकडे भाजीपाला न्यावा, तर पासची अडचण आहे. कृषी विभागाकडे विचारणा करता पोलिस विभागाकडून पास घ्या, असे सांगितले जाते. पण पोलिसही आॅनलाईन भरा, बघू, देऊ, असे सांगत आहेत. त्यामुळे नुसती टोलवा टोलवी सुरु आहे, याबाबतीतही शेतकरी वाऱ्यावरच असल्याचे दिसते.
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...