Farmer Agricultural News farmers get diesel at doorstep Akola Maharashtra | Agrowon

पातूरमधील शेतकऱ्यांना मिळणार घरपोच डिझेल

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

पातूर, जि. अकोला : सद्यःस्थितीत सुरु असलेल्या लाॅकडाउनमुळे शेतीविषयक कामांनाही अडचणी येत आहेत. प्रामुख्याने शेतीसाठीच्या यंत्रांना लागणारे डिझेल आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेतीविषयक कामांसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर व शेतमाल ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना डिझेलचा तुटवडा भासत होता. यावर जिल्हयातील एका पेट्रोलपंप चालकाने तोडगा काढत शेतकऱ्यांसाठी थेट घरपोच डिझेल सेवा सुरु केली आहे. याला जिल्हाधिकाऱ्यांनीही परवानगी दिल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायी बाब ठरली आहे.

पातूर, जि. अकोला : सद्यःस्थितीत सुरु असलेल्या लाॅकडाउनमुळे शेतीविषयक कामांनाही अडचणी येत आहेत. प्रामुख्याने शेतीसाठीच्या यंत्रांना लागणारे डिझेल आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेतीविषयक कामांसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर व शेतमाल ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना डिझेलचा तुटवडा भासत होता. यावर जिल्हयातील एका पेट्रोलपंप चालकाने तोडगा काढत शेतकऱ्यांसाठी थेट घरपोच डिझेल सेवा सुरु केली आहे. याला जिल्हाधिकाऱ्यांनीही परवानगी दिल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायी बाब ठरली आहे.

पातूर-वाशीम रोडवर असलेल्या दुग्गड पेट्रोल पंपाचे संचालक पंजाबराव मोडक यांनी शेतकऱ्यांना मदतीसाठी डिझेलची घरपोच सेवा देण्याचा उपक्रम सुरू केला. या मोबाईल ब्राऊजरचे उद्‍घाटन जिल्हा पुरवठा अधिकारी काळे, तहसीलदार दिपक बाजड, ठाणेदार गजानन गुल्हाने, पंजाबराव मोडक, बाळा लाहोरे व सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सिंचे पालन करून करण्यात आले.

राज्यात घरपोच डिझेल सेवा देणारा पातूर शहरातील हा एकमेव पेट्रोल पंप असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सेवेचा लाभ शेतकऱ्यांसह इतर ग्राहकांना घ्यायचा असल्यास त्यांनी ९६०४७४७३००, ९८५०४८६८९१ मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. सेवा देणाऱ्या टँकरची क्षमता सहा हजार लिटर असून घरपोच सेवा देत असल्यामुळे कोणत्याच प्रकारचा अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना पडणार नाही.

ज्या दरात पेट्रोल पंपावर डिझेल मिळते त्याच दरात घरपोच सेवा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहकांना फायदा होईल. लॉकडाउन असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी व शेतीपूरक व्यवसायासाठी डिझेलची समस्या येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपक्रमाला त्वरित मान्यता दिली. केंद्र सरकारच्या या उपक्रमांमधून महाराष्ट्राला दहा गाड्या देण्यात आल्या आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...