Farmer Agricultural News farmers give Preference jute millet soybean for double sowing Jalgaon Maharashtra | Agrowon

खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी, सोयाबीनला पसंती

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

आमच्या भागात कमी पावसामुळे कापूस, सोयाबीन ही पिके मोडावी लागली. दुबार पेरणी करताना सोयाबीन व तागाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. 
- प्रवीण पाटील, शेतकरी, खेडी खुर्द, जि.जळगाव.

जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे. जळगाव, भुसावळ, यावल, नंदुरबार, शहादा भागातील अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. दुबार पेरणीमध्ये ताग, बाजरी व सोयाबीनला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. 

खानदेशात सुमारे १० हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागली आहे. याचे नेमके आकडे कृषी व इतर यंत्रणांकडे नाहीत. ही दुबार पेरणी कमी पावसासह जमिनी खरडणे, किडी यामुळे करावी लागली आहे. अनेक भागात कापूस लागवडीनंतर कमी पाऊस झाला. त्यात पाने खाणाऱ्या किडी सक्रिय झाल्या आणि पिकाचे नुकसान झाले. जळगाव, यावल भागात अशी पिके मोडण्याची वेळ मागील महिन्यात आली.

या क्षेत्रात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. काही भागांत कमी पावसामुळे सोयाबीनचे पीक मोडावे लागले. शहादा, जळगावमधील यावल, जळगाव भागात हा प्रकार घडला. यामुळे या क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी ताग व बाजरीची पेरणी केली. तसेच अनेक भागात ज्वारी, कडधान्याचे पीक शेतकऱ्यांना मोडवे लागले. पीक मोडण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यात नव्याने बियाणे आणून पेरणी करावी लागली. जळगाव, यावल, भुसावळ भागात दुबार पेरणी अधिक शेतकऱ्यांना करावी लागली आहे.

दुबार पेरणी तूर्त बंद झाली आहे. या महिन्यात दोनदा पाऊस झाला आहे. जळगाव, भुसावळ, शहादा भागात चांगला पाऊस झाला आहे. तर यावल, बोदवड भागात पाऊस कमीच आहे. दुबार पेरणीनंतर एकदा चांगला पाऊस झाला आहे. यामुळे संबंधित भागात बीजांकुर बऱ्यापैकी झाले आहे. दुबार पेरणीत ताग, बाजरीची पेरणी अधिक दिसत आहे. तर जळगाव, यावल, शहादा भागात सोयाबीन अधिक आहे. सोयाबीनची दुबार पेरणी सुमारे एक हजार हेक्टरवर झाली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...