भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात शेतकरी गटांचा पुढाकार

पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना भाजीपाल्याचा पुरवठा व्हावा, यासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे ६२ हून अधिक गटांचा यामध्ये समावेश असून प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे शेतीमाल वाहतुकीसाठी सुमारे ५० गटांनी अर्ज दाखल केले आहेत. परवाने मिळालेल्या गटांतील शेतकऱ्यांनी पुण्यात विविध ठिकाणी भाजीपाला विक्री करण्यास सुरूवात केली आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना भाजीपाल्याचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्यातील शेतकरी गटांनी पुढाकार घेतला आहे.

शासनाने फळे व भाजीपाला या जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राहण्यासाठी निर्देश दिले आहेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी भाजीपाला व फळे पुरविण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात फळे व भाजीपाला पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकरिता शेतकऱ्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी कृषी उपसंचालक विजय कानडे, तंत्र अधिकारी प्रमोद सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी सुनिल खैरनार, तंत्र अधिकारी सत्यवान नरे, तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.

नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील भाजीपाला व फळे उत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक गट, संघ, कंपन्यांची माहिती संकलित करावी. तसेच बाजाराची ठिकाणे निश्चित करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे, माल वाहतूक परवान्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलिस यंत्रणा अधिनस्त उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेवावा. यासोबत कोणत्याही परिस्थितीत भाजीपाला व फळे यांचा पुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घेऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दररोज सादर करावा अशा सुचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनी दिल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com