नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर शेतकऱ्यांकडून दाव्यांची नोंद

परभणी ः शेतीपिकांचे नुकसान झाल्याबद्दल पंतप्रधान पीकविमा योजनेच्या पोर्टलवर शनिवारपर्यंत (ता.२६) जिल्ह्यातील ६ हजार ४०३ शेतकऱ्यांनी दाव्यांची नोंद केली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या पुरामुळे परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ४७३ गावांतील शेतकऱ्यांच्या २७ हजार ४१२ हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी आदी जिरायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोदावरी, दुधना नद्यांना गेल्या काही दिवसांत आलेल्या पुरामुळे नुकसान झाल्यामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते. शेतीपिकांचे नुकसान झाल्याबद्दल पंतप्रधान पीकविमा योजनेच्या पोर्टलवर शनिवारपर्यंत (ता.२६) ६ हजार ४०३ शेतकऱ्यांनी दाव्यांची नोंद केली आहे. नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असून २५४ ठिकाणच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै, आॅगस्ट,सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सुरुवातीपासूनच पाथरी, मानवत, सेलू आदी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त राहिले. सप्टेंबर महिन्यात सततच्या पावसामुळे तसेच जायकवाडी, येलदरी, सिध्देश्वर, निम्न दुधना या धरणांतील विसर्गामुळे गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिके पाण्याखाली गेली. जमिनी खरडून गेल्या. वादळी वाऱ्यामुळे ऊस तसेच ज्वारीचे पीक आडवे झाले. सर्वाधिक नुकसान काढणीच्या अवस्थेतील सोयाबीनच्या शेंगांना तसेच वेचणी आलेल्या कापसातील सरकीला मोड फुटल्याने झाले.

पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना नुकसानीच्या तक्रारी अॅपव्दारे करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले होते. शनिवारपर्यंत (ता.२६) जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यातील ६ हजार ४०० वर शेतकऱ्यांनी दावे दाखल केल्याची पोर्टलवर नोंद झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

प्राथमिक पीक नुकसान स्थिती (हेक्टरमध्ये)
तालुका   गावांची संख्या   बाधित क्षेत्र तक्रारी सर्वेक्षण
परभणी  १०२  ११०००  ६२१  ४९
जिंतूर ७२ ३६९२  २५९३   ६१
सेलू  ११ ४७० ३७५  ४६
मानवत   ५२ २५०० १५२  ३
पाथरी  ४९  १४०० १४१ २४
सोनपेठ   १५   ५०० १३२ १६
गंगाखेड २२  ७५० ११५८ ३८
पालम  ६५ २०००  ४७९
पूर्णा   ८५  १५००० ७५२  १२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com