Farmer Agricultural News Farmers should contact the market committee for soybean subsidy buldhana Maharashtra | Agrowon

बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन अनुदानासाठी बाजारसमितीत संपर्क साधावा ः जिल्हा उपनिबंधक

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

 बुलडाणा   ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१६-१७ मधील ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यात बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केली आहे. अशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्विंटल २०० रूपयांप्रमाणे जास्तीत जास्त २५ क्विंटल मर्यादेत अनुदान जाहीर करण्यात आले होते. या सोयाबीन अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर अदा करण्यात आली आहे. मात्र, जे शेतकरी काही कारणांमुळे वंचित राहिले त्यांनी तातडीने त्यांच्या बाजार समितीकडे अद्ययावत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

 बुलडाणा   ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१६-१७ मधील ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यात बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केली आहे. अशा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्विंटल २०० रूपयांप्रमाणे जास्तीत जास्त २५ क्विंटल मर्यादेत अनुदान जाहीर करण्यात आले होते. या सोयाबीन अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर अदा करण्यात आली आहे. मात्र, जे शेतकरी काही कारणांमुळे वंचित राहिले त्यांनी तातडीने त्यांच्या बाजार समितीकडे अद्ययावत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

शासनाने २०१६-१७ च्या हंगामात सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी २०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले होते. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला २५ क्विंटलची मर्यादा घालून देण्यात आली होती. मात्र, बँक खाते तपशील अथवा इतर माहिती अचूक नसल्याने काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. अशा शेतकऱ्यांनी त्यांना सोयाबीन अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली नसल्यास त्यांनी संबंधीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये त्यांच्या अर्जात नमूद बँक पासबुक अद्ययावत नोंदीसह व इतर तपशील बुधवारपर्यंत (ता.२७) सादर करावा. अन्यथा प्राप्त झालेली व वितरणानंतर शिल्लक असलेली अनुदानाची रक्कम शासनाकडे समर्पित करण्यात येईल, असेही श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...